Pune District Water Shortage: पुणे जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्र झळ; १३३ गावे टँकरवर अवलंबून

लांबलेल्या पावसामुळे आणि घटलेल्या भूजलपातळीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात भीषण पाणी संकट निर्माण झाले आहे
Water Tanker
Water TankerPudhari
Published on
Updated on

पुणे: लांबलेला पाऊस, खालावलेली भूजलपातळी, यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अहवालानुसार १३३ गावे आणि ४९३ वाड्यांमधील सुमारे २.३ लाख नागरिक तसेच ३३ हजारांहून अधिक पशुधन सध्या टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर आणि इंदापूर या तालुक्यांवर दुष्काळाची गडद छाया आहे.

Water Tanker
Sharad Pawar Operation Tiger: 'आमचा एकही खासदार फुटणार नाही'; ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर शरद पवारांचे स्पष्टीकरण

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने १४३ टँकर कार्यरत केले असून, खासगी विहिरी आणि बोअरवेल्सही ताब्यात घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवनासाठी गेल्या दोन वर्षांत विविध उपाययोजना राबविल्याचे सांगितले आहे.

Water Tanker
Women Crime Rate Psychological Analysis: महिलांमधील गुन्हेगारी वाढतेय का? मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल विश्लेषण

मात्र, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी टँकर हा केवळ तात्पुरता उपाय असल्याचे नमूद केले आहे. जलसंधारण, भूजल पुनर्भरण, तलावांचे पुनरुज्जीवन आणि बोअरवेल वापरावर नियंत्रण यांसारख्या दीर्घकालीन उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे. ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावरही या संकटाचा परिणाम होत असून, टँकर कधी येईल याची प्रतीक्षा करणे ही अनेक गावांतील रोजची बाब बनली आहे. महिलांना पाण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असून, शेतकऱ्यांनाही घटत्या भूजलपातळीचा फटका बसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news