Sharad Pawar Operation Tiger: 'आमचा एकही खासदार फुटणार नाही'; ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर शरद पवारांचे स्पष्टीकरण

Sharad Pawar Operation Tiger: बारामतीत ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उत्तर देताना शरद पवारांनी पक्षातील ऐक्याबाबत विश्वास व्यक्त केला
Sharad Pawar
Sharad Pawarfile photo
Published on
Updated on

बारामती: राज्याच्या राजकारणात ऑपरेशन टायगरची सध्या मोठी चर्चा सुरु असतानाच इतर पक्षांचेही आमदार-खासदार फुटणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आमचा एकही खासदार फुटणार नाही, असे स्पष्ट केले.

Sharad Pawar
Women Crime Rate Psychological Analysis: महिलांमधील गुन्हेगारी वाढतेय का? मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल विश्लेषण

बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, "खासदार फुटणार असल्याच्या चर्चेला कोणताही आधार नाही. आमचा एकही खासदार पक्ष सोडणार नाही." राज्यात विविध प्रकारच्या राजकीय चर्चा रंगत असल्या, तरी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

Sharad Pawar
Ketan Agarwal Murder Case: लोहगड हत्याकांड: चेतन चौधरी आधीच किल्ल्यावर; सीसीटीव्हीतून तपासाला नवी दिशा

राज्यात 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा

काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा चांगलीच रंगली आहे. विविध पक्षांतील आमदार आणि खासदार सत्ताधारी पक्षात प्रवेश करू शकतात, अशा चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः शिवसेना (ठाकरे गट) मधील काही खासदारांच्या घडामोडीनंतर या चर्चांना आणखी वेग आला आहे.

Sharad Pawar
Lohagad Case Fast Track Court: केतन अगरवाल प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची कुटुंबाची मागणी

याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील इतर पक्षांतील लोकप्रतिनिधीही पक्षांतर करू शकतात, अशा राजकीय चर्चा सुरू होत्या. मात्र, शरद पवार यांनी आपल्या पक्षाबाबत कोणतीही चिंता नसल्याचे स्पष्ट करत पक्ष संघटना मजबूत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

एकनाथ शिंदे यांच्या विधानानंतर चर्चांना वेग

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "हा तर ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे," असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या विधानानंतर आणखी काही आमदार-खासदार सत्ताधारी गटात प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आले होते.

Sharad Pawar
Pune Cable Theft Gang Arrest: नारायणगाव मोठी कारवाई: कृषीपंप केबल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

मात्र, शरद पवार यांनी या सर्व चर्चांना उत्तर देताना आपल्या पक्षातील खासदारांमध्ये कोणतीही अस्वस्थता नसल्याचे सांगितले. पक्षातील सर्व खासदार एकदिलाने पक्षासोबत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

दरम्यान, आगामी काळात राज्यातील राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी शरद पवार यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील संभाव्य फुटीच्या चर्चांवर सध्या तरी पडदा पडल्याचे मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news