Pune Viral Fever Cases: पुणेकरांनो, काळजी घ्या..! शहरात साथीच्या आजारांचा फैलाव

महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर
Fever
FeverFile Photo
Published on
Updated on

पुणे: पुणे शहर आणि परिसरात हवामानातील बदलांमुळे ताप, थंडी, खोकला आणि सर्दीसारख्या साथीच्या आणि संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. घरोघरी आजाराचे रुग्ण दिसून येत असून, खासगी तसेच पालिकेच्या रुग्णालयांमध्ये ओपीडीबाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत.

दूषित पाणी, वातावरणातील आर्द्रता आणि वाढत्या प्रदूषणामुळे विषाणुजन्य आजार वेगाने पसरत आहेत. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसत आहे. दैनंदिन कामकाजावर परिणाम होणे आणि औषधोपचाराचा आर्थिक भार, यामुळे नागरिक हैराणझाले आहेत.

Fever
Pune Businessman Robbery Case: पुण्यात व्यावसायिकावर गोळीबार; २२ तोळे सोन्याचे दागिने लुटून आरोपी पसार

वाढत्या साथीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग पूर्णपणे अलर्ट मोडवर आला आहे. पालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये तपासणी व औषध वाटप सुरू करण्यात आले आहे. डेंग्यू व चिकुनगुनियाचा धोका टाळण्यासाठी ठिकठिकाणी औषध आणि धूर फवारणी तीव्र केली जात आहे. पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणे आणि स्वच्छता राखण्यावर भर दिला जात आहे.

नागरिकांना लक्षणे दिसताच स्व-औषधोपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळावे, उकळून थंड केलेले पाणी प्यावे आणि परिसरात पाणी साचू देऊ नये.

Fever
One sided love case: एकतर्फी प्रेमसंबंधातून जागामालकाचा खून; चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात आरोपी स्वतः हजर

ताप किंवा खोकला तीव्र असल्यास त्वरित जवळच्या पालिका दवाखान्यात संपर्क साधावा. प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी अजिबात घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा प्रकारची जनजागृतीही केली जात आहे.

धोक्याची चिन्हे

  • तीव्र ताप, थंडी वाजून येणे किंवा अंगदुखी.

  • सांधेदुखी, डोकेदुखी किंवा डोळ्यांच्या पाठीमागे दुखणे.

  • अंगावर लालसर पुरळ येणे.

  • सतत उलट्या किंवा जुलाब होणे.

आजारपणाची कोणतीही लक्षणे दिसल्यास घरगुती उपाय करीत बसू नका. त्वरित जवळच्या मनपा दवाखान्यात जा किंवा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. मनपा दवाखान्यांमध्ये मोफत आणि योग्य वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचार उपलब्ध आहेत.

- डॉ. वैशाली जाधव, सहाय्यक आरोग्‍य अधिकारी, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news