Pune Vegetable Market: पुणे मार्केट यार्डात फळभाज्यांचे दर स्थिर; काही भाज्यांच्या किमतीत घट

काकडी, सिमला मिरची आणि कैरीचे दर घसरले; तर पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने पुदिना, मेथी, पालक महागले
Vegetable
VegetablePudhari
Published on
Updated on

शंकर कवडे

पुणे: गुलटेकडी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. रविवारी (दि. २८) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून मिळून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. बाजारात दाखल झालेल्या मालाच्या तुलनेत मागणी कमी राहिल्याने काकडी, सिमला मिरची आणि तोतापुरी कैरीच्या दरात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली. उर्वरित सर्व फळभाज्यांची आवक-जावक कायम राहिल्याने त्यांचे दर स्थिर राहिले असल्याची माहिती ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

Vegetable
Pune Fruit Market: पुणे फळबाजारात आवक घटली; कलिंगड-खरबुजाचे भाव वाढले, पपईची आवक वाढली

परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात येथून हिरवी मिरची १४ ते १५ टेम्पो, कर्नाटक येथून कोबी ३ ते ४, हिमाचल प्रदेश, कर्नाटक येथून घेवडा २ ते ३ टेम्पो, कर्नाटक येथून भुईमूग शेंग ३ टेम्पो, इंदौर येथून गाजर ८ ते १० टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी ४ ते ५ टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा २ ते ३ टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार २ टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसणाची सुमारे १० ते १२ टेम्पो, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून मिळून बटाट्याची ४० टेम्पो इतकी आवक झाली.

Vegetable
Pune Bhusar Market: पुणे भुसार बाजारात मंदी कायम; मागणीअभावी उलाढाल ठप्प, भाव स्थिर

स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे ४५० ते ५०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ३ टेम्पो, टोमॅटो ७ हजार क्रेटस, हिरवी मिरची ३ ते ४ टेम्पो, काकडी ५ ते ६ टेम्पो, फ्लॉवर ८ ते १० टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, गाजर ४ ते ५ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, घेवडा आणि पावटा प्रत्येकी २ ते ३ टेम्पो, शेवगा २ टेम्पो, भुईमूग शेंग ५० ते ६० गोणी, कांदा सुमारे १५० टेम्पो इतकी आवक झाली.

Vegetable
Chakan Vegetable Market: चाकण बाजारात कांद्याचे भाव वाढले; आवक घटल्याने दर तेजीत, भाजीपाल्याला विक्रमी मागणी

आवक घटल्याने पुदिना, मेथी, पालक महागले

मार्केट यार्डात पालेभाज्यांची घटलेली आवक कायम आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे पुदिना, मुळा आणि पालकच्या भावात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर कोथिंबिर, मेथीचे वाढलेले भाव कायम आहेत. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत.

Vegetable
Pune Fish Prices: पुण्यात मासळी महागली; आवक निम्म्यावर, चिकन-मटणाचे दर मात्र स्थिर

मार्केट यार्डात रविवारी (दि. २८) कोथिंबिरीची ९० हजार जुडी आणि मेथीची ३० हजार जुडींची आवक झाली. ही आवक नेहमीच्या तुलनेत कमी असून, मागील आठवड्याच्या तुलनेतही दोन्हींच्या आवकमध्ये १० हजार जुडींनी घट झाली आहे. कोथिंबिर आणि मेथीच्या जुडीला घाऊक बाजारात दर्जानुसार १५ ते २५ रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news