Pune Waste Management: उरुळी देवाची कचरा प्रकल्पाचा वादग्रस्त प्रस्ताव मागे

विनानिविदा निर्णय रद्द; आता नव्याने निविदा काढून प्रकल्प राबवला जाणार
Garbage Management
Garbage ManagementPudhari
Published on
Updated on

पुणे: उरुळी देवाची येथे 500 मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी विनानिविदा पद्धतीने प्रस्तावित करण्यात आलेला वादग््रास्त प्रकल्प अखेर मागे घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी आता नियमित निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्या नंतरच त्याचे काम दिले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली.

Garbage Management
Pune Water Dispute: पुण्यात पाणीपट्टी वादावर मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप

महापालिका प्रशासनाने नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कामकाज नियमावलीतील कलम 5:2:2 अंतर्गत देवाची उरुळी येथील कचरा डेपोमध्ये 500 टन क्षमतेचा ओला कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. हा प्रकल्प ‌‘भूमी ग््राीन एनर्जी‌’ या कंपनीला विनानिविदा देण्याचे सुचविले होते. प्रस्तावानुसार, दहा अधिक दहा असे एकूण 20 वर्षांसाठी प्रतिटन 690 रुपये टिपिंग फी आणि दरवर्षी 10 टक्के वाढ देण्याची या प्रस्तावात तरतूद होती.

Garbage Management
Property Tax Cheque Bounce: पुण्यात मिळकतकराचे 7 हजारांहून अधिक धनादेश बाउन्स

दरम्यान, स्थायी समितीच्या बैठकीत काँग््रेास सदस्य प्रशांत जगताप यांनी विनानिविदा आलेल्या या प्रस्तावाला विरोध करत हा विषय कार्यपत्रिकेवर घेण्याची मागणी केली. काँग््रेासचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि गटनेते चंद्रकांत कदम यांनी आयुक्तांवर राजकीय दबावाखाली निर्णय घेतल्याचा आरोप केला. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले की, हडपसर परिसरातील उघड्यावर साचलेल्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.

Garbage Management
Cow Urine Business: गोमूत्रातून कोटींची उलाढाल; शेतकऱ्यांना नवे उत्पन्नाचे साधन

त्यामुळे ओल्या कचऱ्यावर तातडीने प्रक्रिया करणे आवश्यक होते. नवीन प्रकल्प उभारण्यासाठी 8 ते 10 महिने लागणार असल्याने तात्पुरत्या उपाययोजनेतून सध्या कार्यरत असलेल्या ‌‘भूमी ग््राीन‌’ कंपनीलाच काम देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी सुमारे 40 ते 50 कोटी रुपयांचा खर्च संबंधित ठेकेदाराने करायचा होता. मात्र, कामाचा कालावधी 10 वर्षांपेक्षा अधिक वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असताना तो जास्त असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रशासनाने हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Garbage Management
LPG Booking Delay: उरुळी कांचनमध्ये गॅस सिलिंडरसाठी 45 दिवसांची प्रतीक्षा

मात्र, त्यापूर्वीच आयुक्तांची स्वाक्षरी झाल्याने प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविला गेला होता, असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात मुख्यमंत्री किंवा कोणत्याही आमदाराचा दबाव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्वी याच कंपनीने केलेल्या बायोमायनिंगच्या कामाच्या तुलनेत सध्याच्या निविदांमध्ये कमी दर मंजूर झाल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रस्ताव तयार करताना त्रुटी लक्षात आल्याने तो स्थायी समितीसमोर येण्यापूर्वीच मागे घेण्यात आल्याचे सांगत, लवकरच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नव्याने निविदा काढण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news