Pune Student Safety: पुणे विद्यापीठात परदेशी विद्यार्थिनींसोबत डिलिव्हरी बॉयकडून अश्लील वर्तन

पुन्हा विद्दार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Assault
AssaultPudhari
Published on
Updated on

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परदेशी विद्यार्थिनींच्या वसतिगृहात डिलिव्हरी बॉयकडून अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Assault
Pune Real Estate Fraud: पुण्यात बिल्डरचा 800 कोटींचा घोटाळा

शुक्रवारी रात्री घडलेल्या या प्रकाराची माहिती शनिवारी अधिसभेत समोर आली. संबंधित विद्यार्थिनींनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याशी संवाद साधताना पोलिसांत तक्रार दाखल न करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप केला. प्राध्यापकांचे निवासस्थान असलेल्या इमारतीत काही परदेशी विद्यार्थिनींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Assault
Pune Scholarship Delay: पुणे विद्यापीठात शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित

या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा रक्षक अशा कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नसल्याची बाब अधिसभेसमोर आली. विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, डिलिव्हरी बॉय ऑर्डर दिलेली वस्तू देण्यासाठी आला असताना त्याने अश्लील वर्तन केले. त्यानंतर त्यांनी तातडीने सुरक्षा रक्षकांना माहिती दिली. मात्र, पोलिसांत तक्रार नोंदवू नये म्हणून दबाव आणत लेखी निवेदन घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Assault
Pune Liquor Smuggling: पुण्यात मद्य तस्करी टोळीचा पर्दाफाश

या प्रकारामुळे संतप्त सदस्यांनी विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव टीका केली. आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले असून, प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणाबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

Assault
Pune Municipal Health Services: पुणे महापालिकेच्या आरोग्यसेवेवर प्रश्नचिन्ह

परदेशी विद्यार्थिनींच्या वसतिगृहात तत्काळ 24 तास महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. आवार ग््राील लावून सुरक्षित करण्यात येईल. विद्यार्थिनींना गरज भासल्यास पर्यायी वसतिगृह उपलब्ध करून दिले जाईल. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.

डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news