Pune University: विद्यापीठाची प्रमाणपत्रे आता अधिक सुरक्षित, ‘या’ प्रिंटिंग प्रेसमध्ये होणार छपाई

विद्यापीठाच्या इतिहासातील हा महत्त्वाचा निर्णय : आता छपाईसाठी १६ सुरक्षा माणके
Pune University
Pune University Pudhari Photo
Published on
Updated on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विविध प्रमाणपत्र आणि श्रेयांक पत्रकांचा कागद आता नाशिकच्या भारत प्रतिभूति मुद्रणालय अर्थात इंडियन सिक्युरिटी प्रेसमधून छापला जाणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासातील हा महत्त्वाचा निर्णय असून प्रमाणपत्रांच्या छपाईत पूर्वी ६ असलेली सुरक्षा माणके आता १६ होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्रे आता अधिक सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण असणार आहे.

Pune University
Pune University Exam Fee Hike: विद्यापीठाचा शुल्क वाढीचा दणका; परीक्षा शुल्कात 20 टक्क्यांनी वाढ

इंडियन सिक्युरिटी प्रेस ही देशातच नाही जगात सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या प्रेसपैकी एक आहे. भारतासह अनेक देशातील पासपोर्ट, १० रुपयांपासून ५० हजारापर्यंतचे मुद्रांक, महसूल विभागाचे मुद्रांक, इलेक्शन सील, लिकर सील, लष्करी आस्थापनांची ओळखपत्रे, देशातील अनेक विद्यापीठे, केंद्रीय विद्यालयांची गुणपत्रके आदींची छपाईची कामे नाशिकच्या या सिक्युरिटी प्रेसमध्ये होतात.

विद्यापीठाच्या प्रमाणपत्राची छपाई पारदर्शक, सुरक्षित, गोपनीय पद्धतीने कशी करावी, यासाठी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या अध्यक्षतेखाली कुलसचिव प्रा. ज्योती भाकरे, परीक्षा संचालक डॉ. प्रभाकर देसाई आदींच्या समितीने संबंधित खरेदी प्रक्रिया राबवली. नुकतीच या समितीने इंडियन सिक्युरिटी प्रेसची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. देशातील ३ प्रेसने दाखल केलेली खरेदी प्रक्रिया राबविली. त्यानुसार इंडियन सिक्युरिटी प्रेसला काम देण्याबाबत अहवाल दिला. सिक्युरिटी प्रेसची सुरक्षा माणके, कागदाचा नमुना, प्रेसची गोपनीयता आणि विश्वासार्हता आदींमुळे यापुढे प्रो प्रिंटेड स्टेशनरीची खरेदी इंडियन सिक्युरिटी प्रेसमधून करण्यात यावी, या बाबीला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद आणि खरेदी समितीनेही तत्काळ मंजुरी दिली आहे.

Pune University
Pune University : बाप रे! विद्यापीठाच्या जेवणात पुन्हा अळ्या

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रमाणपत्रे इंडियन सिक्युरिटी प्रेस इथे छापली जावी, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली होती. बाहेरच्या खासगी प्रेसला दिल्या जाणाऱ्या निविदेत केवळ ६ सुरक्षा मानके होती. दरही काही पट अधिक होता. त्यामुळे पुणे विद्यापीठावर प्रमाणपत्र कागद खरेदीतील भ्रष्‍ट्राचाराचेही आरोप होते. यावर उपाय म्हणून नाशिकच्या शासकीय इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये छपाई व्हावी अशी मागणी मी दोन वर्षापूर्वी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत केली होती. झालेला निर्णय विद्यापीठाच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. यामुळे विद्यापीठाचे कोट्यवधी रुपयांची बचत होणार असून, प्रमाणपत्रेही अति सुरक्षित होणार आहे.

- सागर वैद्य, सदस्य व्यवस्थापन परिषद, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news