Vehicle Removal Drive: पोलिस हटवताहेत वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहने; दै. 'पुढारी'च्या मोहिमेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पंधरा दिवसांत शंभरावर तक्रारी
vehicle removal drive
vehicle removal drive File Photo
Published on
Updated on

पुणे: वाहतुकीला अडथळा करत पडून असलेली वाहने हटविण्यासाठी पोलिसांनी हाती घेतलेल्या मोहिमेत दै. 'पुढारी'ही सहभागी झाले असून, गेल्या पंधरा दिवसांत शंभराहून अधिक वाहनांच्या तक्रारी पोलिसांच्या पीटीपी (पुणे सिटी ट्रॅफिक पोलिस) ॲपवर नोंदवल्या आहेत. त्यापैकी अनेक वाहने रस्त्यावरून दूर करण्यात वाहतूक पोलिसांनी यश मिळविले आहे.

दै. 'पुढारी'ने ३ जूनपासून रस्त्यावर धूळ खात पडून वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या अशा वाहनांकडे नागरिकांचे व वाहतूक पोलिसांचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली. त्यासाठी ठिकठिकाणी बराच काळ पडून असलेल्या वाहनांची छायाचित्रे ठळकपणे प्रसिद्ध केली.

vehicle removal drive
Pune Water Crisis: पालिकेच्या पाण्यावर खासगी टँकरचालकांची मौज

तसेच त्यांची माहिती पोलिसांच्या पीटीपी ॲपवरही नोंदविली. दै. पुढारीच्या या मोहिमेला नागरिकांकडूनही वाढता प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी पुढारीच्या छायाचित्रकाराला अशा वाहनांची माहिती पुरविली आहे.

दै. 'पुढारी'ने पीटीपी ॲपवर नोंदविलेल्या ११ पैकी सहा वाहनांसंदर्भात वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली असून, काही वाहने संबंधित वाहन मालकांनी रस्त्यावरून हटविली आहेत, तर काही तेथून हटविण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे.

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांबाबत जनजागृती सुरू झाल्याने नागरिकांकडूनही पडून असलेल्या अशा वाहनांच्या तक्रारी पीटीपी ॲपवर नोंदविण्याचे प्रमाण वाढले असल्याचे या ॲपचे काम पाहणाऱ्या महिला पोलीस हवालदार बेंद्रे यांनी सांगितले. बुधवारी दुपारपर्यंत अशा तीन तक्रारी नोंद झाल्या असून, १ जूनपासून ११३ तक्रारींची नोंद झाली असल्याची माहिती त्यांनी दिली.

दाखल झालेल्या ११३ तक्रारींपैकी १५ वाहने पोलिसांचे फोन जाताच संबंधितांनी काढून घेतली, तर ८७ वाहने काढण्यासाठीची कारवाई सुरू आहे. या तक्रारीपैकी ११ तक्रारी चुकीच्या माहितीमुळे रद्द कराव्या लागल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

vehicle removal drive
Cooperation Week: केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सहकार सप्ताह; सहकार आयुक्त व निबंधक दिपक तावरे यांची माहिती

पीटीपी ॲपवर अशी माहिती आल्यानंतर ती माहिती लगेचच संबंधित भागातील वाहतूक विभागाकडे पाठविली जाते. तेथील अधिकारी अशा वाहनांच्या मालकांशी संपर्क साधून त्यांना अडथळा ठरणारे वाहन काढण्याच्या सूचना देतात.

वाहनमालकाची माहिती उपलब्ध होत नसल्यास अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांचे नोटीसवजा स्टिकर चिकटविण्यात येते. त्यानंतरही ४८ तासांत ते हलविले न गेल्यास क्रेनच्या साहाय्याने ते वाहतूक विभागात नेण्यात येते.

गेले काही दिवस वाहतूक विभागाकडे क्रेन उपलब्ध नव्हत्या परंतु, नुकत्याच त्या उपलब्ध झाल्याने आता या कारवाईला वेग येईल, अशी माहिती या विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

पीटीपी ॲपवरील अनेक तक्रारी होतात डिक्लाईन

वाहतूक पोलिसांच्या पीटीपी ॲपवर रिपोर्ट व्हायोलेशन आणि रिपोर्ट इन्सिडेंट असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी व्हायोलेशनच्या पर्यायात अबॅन्डंड व्हेईकलची माहिती नोंदवण्याची सुविधाच उपलब्ध नाही.

या पर्यायाद्वारे नो पार्किंग, डबल पार्किंग, फूटपाथ पार्किंग आदी ठिकाणी उभ्या केलेल्या वाहनांच्या तक्रारी नोंदविता येतात. या पर्यांयाचा वापर करून पडून असलेल्या वाहनाची माहिती दिल्यास ती तक्रार डिक्लाईन होते. त्यामुळे नागरिकांनी तक्रार करताना रिपोर्ट इन्सिडेंट या पर्यायाची निवड करावी, असे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news