Pune Encroachment Removal Drive: पुणे महापालिकेचा अतिक्रमणांवर सलग आठव्या दिवशीही हातोडा; २.३२ लाख चौ. फूट जागा मोकळी

गुरुनानक जयंतीच्या सुटीतही कारवाईचा धडाका; फ्रंट आणि साइड मार्जिनमधील अतिक्रमणे हटवली
Pune Encroachment Removal Drive
Pune Encroachment Removal DrivePudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: गुरुनानक जयंतीची सार्वजनिक सुटी असतानाही महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकांनी विश्रांती न घेता शहरभर कारवाईचा धडाका कायम ठेवला. सलग आठव्या दिवशी सुरू असलेल्या या मोहिमेत इमारतींच्या फ्रंट आणि साइड मार्जिनमध्ये केलेली अतिक्रमणे हटवून तब्बल २ लाख ३२ हजार ६५० चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली.

Pune Encroachment Removal Drive
Baramati Crime: मुलगाच हवा म्हणून विवाहितेचा इच्छेविरुद्ध गर्भपात; पतीसह चौघांवर बारामतीत गुन्हा

शहरातील विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकाच वेळी पथके उतरवून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे व्यावसायिक आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या पथ विभागाचे उपायुक्त अनिरुद्ध पावसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, झोन एकमध्ये उंड्री येथे ४८ हजार ८०० आणि धानोरी येथे ३७ हजार ७०० चौरस फूट, अशा एकूण ८६ हजार ५०० चौरस फूट जागेवरील अतिक्रमणे हटविण्यात आली.

Pune Encroachment Removal Drive
Baramati Teacher Case: अल्पवयीन विद्यार्थिनीवरील अत्याचारप्रकरणी शिक्षकाला २० वर्षांची शिक्षा; ४५ हजारांचा दंड

झोन दोनमध्ये कात्रज येथे २० हजार, तर झोन तीनमधील बाणेर परिसरात ६५ हजार चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली. झोन चारमध्ये कसबा पेठेत १ हजार ८५०, झोन पाचमध्ये कौसरबाग येथे ३३ हजार, तर झोन सहामध्ये शास्त्री रस्ता, नवी पेठ येथे ४ हजार ५०० आणि कर्वेनगर पानंद रस्त्यावर २१ हजार ८०० चौरस फूट जागेवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली.

Pune Encroachment Removal Drive
Purandar Water Shortage: पुरंदरमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद; अंबाजीचीवाडीचा तलाव कोरडा, ग्रामस्थांची टँकरची मागणी

करिश्मा चौक ते वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय, कात्रज डेअरी ते त्रिमूर्ती चौक, सरहद चौक, पॅनकार्ड रोड, उंड्री रस्ता आणि धानोरी-लोहगाव रस्त्यासह विविध भागांत ही मोहीम राबविण्यात आली.

Pune Encroachment Removal Drive
Pune Zilla Parishad Nominated Members: पुणे जिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यपदांसाठी हालचालींना वेग; बारामतीसह जिल्ह्यात इच्छुकांची फिल्डिंग

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले

सुटीच्या दिवशीही कारवाई सुरू ठेवून महापालिकेने अतिक्रमणधारकांना स्पष्ट संदेश दिला आहे. फ्रंट आणि साइड मार्जिनमधील अतिक्रमणांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचे या मोहिमेतून अधोरेखित झाले आहे. आगामी काळातही ही कारवाई सुरू राहणार असल्याने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.