
आज सर्वत्र गणपती बाप्पांचे वाजत गाजत आगमन झाले. पुण्यातले पाचही मानाचे गणपती विशेष सजावट केलेल्या मंदिरांच्या देखाव्यात दाखल झाले आहेत. पाहुयात या गणपतींचे देखणे रूप
मानाचा पहिला आणि पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे आज थाटामात मानाचा बल्लाळेश्वर मंदिर (पाली) मंदिराच्या देखाव्यात विराजमान
(फोटो सौजन्य : प्रसाद जगताप )
मानाचा दुसरा बाप्पा तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा विराजमान झाला असून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते आहे
मानाचा तिसरा गुरुजी तालीम काशी विश्वनाथ मंदिरात विराजमान झाला असून त्याचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे
आपल्या राजस रुपासह मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग गणपती वृंदावन महाल मंदिरात विराजमान झाला आहे
मनाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे आज थाटात आगमन झाले आहे
अखिल मंडई मंडळाचे शारदा गणेश कृष्णकुंज काल्पनिक महालात विराजमान झाले आहेत
पुण्यातील नवसाचा बाबू गेनू गणपती बाप्पा मैसूर पॅलेसच्या मनोहारी सजावटी मध्ये विराजमान झाला आहे. दर्शनासाठी गर्दी
पुण्यातल्या गणपतींची सफर दगडूशेठ गणपतीशिवाय अपूर्ण आहे. हा श्रीमंत बाप्पा आज विराजमान झाला असून त्याच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे