Pune Tenant Verification: पुण्यात १००हून अधिक घरमालकांवर गुन्हे; भाडेकरूंची माहिती न देणे पडले महागात

‘भाडे मिळाले की झाले’ वृत्तीला पोलिसांचा दणका; भाडेकरू पडताळणी न केल्यास सुरक्षेलाही धोका
Tenant Police Information
Tenant Police InformationPudhari
Published on
Updated on

महेंद्र कांबळे

पुणे: घर भाड्याने दिले... महिन्याला भाडे खात्यावर जमा झाले... की, घरमालकांची जबाबदारी संपली! भाडेकरू कोण आहे, कुठून आला आहे, त्याचा पूर्वइतिहास काय आहे, ओळखपत्र खरे आहे का, याची साधी चौकशीही न करणाऱ्या घरमालकांना आता पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. भाडेकरूंची माहिती पोलिसांकडे नोंदवून न देणाऱ्या १००हून अधिक घरमालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईमुळे 'भाडे मिळाले की झाले' या बेफिकीर वृत्तीचा गंभीर धोका पुन्हा समोर आला आहे.

Tenant Police Information
Pune Digital Arrest Fraud: ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ज्येष्ठाची १०.७४ कोटींची फसवणूक; रीलस्टार मुख्य सूत्रधाराला अटक

पुणे हे शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, उद्योग आणि रोजगाराचे प्रमुख केंद्र. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी, नोकरदार, कामगार, व्यावसायिक आणि विविध कारणांसाठी येणारे नागरिक शहरात वास्तव्यास असतात. सदनिका, खोल्या, पीजी, वसतिगृहे अशा विविध ठिकाणी त्यांचा मुक्काम असतो. मात्र, घरमालकांनी भाडेकरूची योग्य पडताळणी न करताच घर भाड्याने देण्याचे प्रकार सर्रास सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाले आहे. भाडेकरूची माहितीच नाही! अनेक घरमालकांकडून भाडेकरूचा कायमचा पत्ता, ओळखपत्र, संपर्क क्रमांक यासह आवश्यक माहिती घेतली जात नाही. काही प्रकरणांत माहिती घेतली असली तरी ती पोलिसांकडे नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली नसते. त्यामुळे एखाद्या प्रसंगी संबंधित व्यक्ती शहरात नेमकी कुठे वास्तव्यास आहे, याचा मागोवा घेणे पोलिसांसाठी देखील अडचणीचे ठरू शकते.

Tenant Police Information
India Rice Export 2026: भारतीय तांदळाच्या निर्यातीला झेप; सहामाहीत ५ टक्क्यांची वाढ

सुरक्षेचा गंभीर प्रश्नगुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती बनावट ओळख किंवा अपुरी माहिती देऊन शहरात वास्तव्यास राहिल्यास त्याचा थेट परिणाम शहराच्या सुरक्षेवर होऊ शकतो. त्यामुळे भाडेकरूंची पडताळणी ही केवळ कागदोपत्री प्रक्रिया नसून, शहराच्या सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाची बाब आहे, तर दुसरीकडे उपनगरांच्या परिसरात बेकायदा उभारण्यात आलेल्या खोल्यांमध्ये गुन्हेगार वास्तव्यास असल्याचे देखील यापूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुढे आले आहे. तसेच, शहरात बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांग्लादेशींचा देखील मोठा प्रश्न आहे. अनेकदा त्यांच्याकडून बनावट कागदपत्रे तयार करून पुण्यात वास्तव्य केले जाते. त्यासाठी पोलिसांना अशा भाडेकरूंची माहिती असणे गरजेचे आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वेळोवेळी घरमालकांना भाडेकरूंची माहिती देण्याचे आवाहन केले जाते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या घरमालकांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

Tenant Police Information
Pune Scholarship Protest: कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीसाठी भरपावसात आंदोलन; ३० सप्टेंबरपर्यंत थकीत रक्कम देण्याचे आश्वासन

दहशतवादी कनेक्शन आले होते समोर

भाडेकरू पडताळणीचे गांभीर्य पुणे यापूर्वीच अनुभवले आहे. राजस्थानातील दहशतवादी कटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर असलेले मोहम्मद इम्रान मोहम्मद युनूस खान आणि मोहम्मद युनूस मोहम्मद याकूब साकी हे दोघे पुण्यात भाड्याच्या घरात वास्तव्यास असल्याचे २०२३ मध्ये समोर आले होते. कोथरूड पोलिसांनी वाहनचोरीच्या संशयावरून त्यांना पकडल्यानंतर त्यांच्या दहशतवादी कनेक्शनचा धक्कादायक खुलासा झाला. तपासात त्यांचा कोंढव्यातील भाड्याच्या सदनिकेशी संबंध असल्याचे समोर आले होते.

Tenant Police Information
PMPML Office Decoration: टाकाऊपासून टिकाऊ; पीएमपी कार्यालयाला वारली कलेची आकर्षक झळाळी

कोंढव्यातील त्या सदनिकेतून संशयास्पद साहित्य आणि अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. वेळीच संशयित पोलिसांच्या हाती लागल्याने पुढे घडू शकणारा मोठा अनर्थ टळला, अशी गंभीर बाब या प्रकरणातून अधोरेखित झाली. भाडेकरूची योग्य पडताळणी झाली असती तर त्याच्या हालचालींची माहिती यंत्रणांना आणखी आधी मिळाली असती, हा मुद्दाही या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा ठरतो.

घरमालकांनो, हे लक्षात ठेवा!

घर भाड्याने देताना... भाडेकरूचे ओळखपत्र तपासा. कायमचा पत्ता आणि संपर्क क्रमांक घ्या. कागदपत्रांची आवश्यक पडताळणी करा. भाडेकरूची माहिती पोलिसांकडे नोंदवा. करारातील माहिती अचूक आहे, याची खात्री करा. संशयास्पद माहिती आढळल्यास पोलिसांना कळवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news