Pune Superstition Cases: पुण्यात अंधश्रद्धेचा पगडा कायम; पाच वर्षांत 50 हून अधिक गुन्हे

जादूटोणा व अघोरी प्रथांमुळे अनेक फसवणूक व छळाच्या घटना उघड; अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कठोर अंमलबजावणीची गरज
Superstition
SuperstitionPudhari
Published on
Updated on

पुणे: शिक्षणाचे माहेरघर आणि आयटीचे हब अशी ओळख असलेल्या पुरोगामी पुण्यावर अद्यापी जादूटोणा, अघोरी प्रथा अशा अंधश्रद्धेचा पगडा कायम आहे. महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार पुणे शहर व परिसरात गेल्या पाच वर्षांत पन्नासहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यावरूनही हेच स्पष्ट होते.

Superstition
Pune Drug Bust: पुणे विमानतळावर 77 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

नाशिकजवळील मिरगावचा भोंदू अशोक खरातचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच माहिती अधिकार कार्यकर्ते सचिन नेलेकर यांनी पोलिसांकडून मिळविलेल्या माहितीमुळे पुण्यातील अंधश्रद्धेबाबतचे हे भयानक वास्तव समोर आले आहे. अंधश्रद्धाविरोधी कायद्यासाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुण्यातच असे प्रकार सुरू आहेत, हे सहजासहजी कोणाला पटले नसते, पण दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे, हे मान्य करावे लागते. ‌‘तुझी बायको अवदसा आहे... तिच्यामुळे तुझं राजकारण संपेल... तिला सोडचिठ्ठी दे,‌’ असा सल्ला देत एका ‌‘हायप्रोफाइल‌’ गुरूने विवाहित महिलेच्या आयुष्याशी खेळ केला होता. लिंबू उतरवणे, ग््राहदोष सांगणे आणि अघोरी विधी करण्याच्या नावाखालीही तिचा मानसिक छळ करण्यात आला होता. या प्रकरणात संबंधित गुरुजीला अटकही झाली. एका उच्चशिक्षित कुटुंबात घडलेली ही घटना पुण्यावरील अंधश्रद्धेच्या पगड्याची भीषणता अधोरेखित करणारी ठरली होती.

Superstition
LPG Cylinder Scam: हिंजवडीतील गॅस एजन्सीवर कारवाई; सिलिंडर विक्रीवर बंदी

अंधश्रद्धाविरोधी कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी चमत्कारांच्या नावाखाली लैंगिक अत्याचार आणि आर्थिक शोषणाचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत होते. कायद्यामुळे त्यात काही प्रमाणात घट झाली असली तरीही अंधश्रद्धेचे पूर्णपणे निर्मूलन झालेले नाही, हेच पोलिसांकडे उपलब्ध आकडेवारी स्पष्ट करते. मुठा नदीपात्रात घडलेला अघोरी प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे, ज्या परिसरात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली, त्याच्याजवळच झालेल्या या जादूटोण्यामुळे खळबळ उडाली होती.

Superstition
Pune university Budget: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प तुटीत

‌‘काळी जादू काढतो‌’ असे सांगून चंदननगरमधील एका कुटुंबाची फसवणूक करण्यात आली होती, तर कोरेगाव पार्कमध्ये ‌‘खजिना मिळवून देतो‌’ असे सांगत एका महिलेला लाखोंना गंडा घालण्यात आला होता. कोथरूडमध्ये आयटी इंजिनीअर असलेल्या एका दाम्पत्याला तब्बल 13-14 कोटी रुपयांना गंडा घातल्याचेही उघड झाले होते. हडपसरमध्ये महिलेला नग्न झोपवून तिचा अमानुष छळ करण्यात आला होता. जादूटोण्याच्या नावाखाली कासव, मांडूळ, खवले मांजर यांची तस्करी होत असल्याचेही समोर आले आहे. मागील दोन वर्षांत कोट्यवधींच्या मांडूळ सापांची तस्करी करणाऱ्या 14 जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले होते.

Superstition
Maharashtra Revenue Growth: महसूलवाढीत महाराष्ट्र देशात अव्वल; जीएसटीमध्ये 45% वाढ

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचले. शासनाने त्यासाठी कायदा पारित केला. तरीही समाजात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा अजूनही कायम आहेत. एकीकडे विज्ञानाची कास धरणारे पुणे, तर दुसरीकडे अघोरी जादूटोण्याच्या गर्तेत अडकलेले पुणेकर, हे वास्तव. ही दुभंगलेली ओळख धोक्याची घंटा ठरत आहे.

विशाल विमल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कायकर्ते

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news