Pune Supari Killing Case: 75 लाखांच्या सुपारी प्रकरणात पिस्तूल पुरवणारा जेरबंद; दोन वर्षांनी पोलिसांच्या ताब्यात

कौटुंबिक वादातून मुलाच्या खुनाचा कट; गुन्हे शाखेची कारवाई
Gun
GunPudhari
Published on
Updated on

पुणे: कौटुंबिक वादातून स्वतःच्या मुलाच्या खुनासाठी 75 लाखांची सुपारी दिल्याच्या प्रकरणातील पिस्तूल पुरविणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. तब्बल दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्यावर मोक्काअंतर्गत देखील कारवाई केली होती. नीलेश श्रीकांत गायकवाड (वय 24, रा. पिसोळी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Gun
Pune RMC Plant Pollution: पुण्यात बेकायदेशीर आरएमसी प्लांट्सवर कारवाईची मागणी; रहिवासी भागांत प्रदूषणाचा वाढता धोका

16 एप्रिल 2024 रोजी दुपारी जंगली महाराज रोडवरील एका बांधकाम व्यावसायिकावर पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळी न सुटल्याने त्यांचा जीव वाचला होता. घटनेनंतर आरोपींनी ‌’तू आता वाचलास‌’ असे म्हणत तेथून पळ काढला. तपासादरम्यान कौटुंबिक वादातून वडिलांनीच मुलाच्या खुनासाठी दोघांना 75 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. यातील शूटरांना पिस्तूल पुरविणारा नीलेश गायकवाड हा घटनेनंतर फरार होता.

Gun
Maharashtra Land Records Reform: भूकरमापक पद रद्द; ‘परिरक्षण भूमापक’ नव्या संवर्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी

30 मार्च रोजी खंडणीविरोधी पथक काळेपडळ परिसरात गस्त घालत असताना गायकवाड हा आपल्या आईला भेटण्यासाठी पिसोळी येथे येणार असल्याची माहिती पोलिस हवालदार नितीन मुंढे यांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम राजमाने, पोलिस उपनिरीक्षक गौरव देव, कर्मचारी नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, दिलीप गोरे, साहिल शेख यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news