

पुणे: जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामाने आता चांगलाच वेग पकडला आहे. ऊस गाळपात खासगी साखर कारखान्यांमध्ये बारामती ॲग््राो, दौंड शुगरची आघाडी कायम आहे. मात्र, सर्वाधिक निव्वळ साखर उताऱ्यामध्ये सहकारी साखर कारखान्यांचा डंका कायम आहे. त्यामध्ये श्री सोमेश्वर, दी माळेगाव, श्री विघ्नहर, श्री छत्रपती आणि भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.
जिल्ह्यातील 13 साखर कारखान्यांकडून मंगळवारअखेर (दि.16) 47 लाख 16 हजार 510 मेट्रिक टन इतके ऊस गाळप पूर्ण झाले आहे. निव्वळ 8.52 टक्के साखर उताऱ्यानुसार सुमारे 40 लाख 20 हजार 176 क्विंटल साखरेचे उत्पादन तयार झाल्याची माहिती साखर आयुक्तालयाच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. दैनिक 1 लाख 26 हजार मेट्रिक टन इतके ऊस गाळप सध्या सुरू आहे.
जिल्ह्यात सद्यःस्थितीत 8 सहकारी साखर कारखान्यांकडून 23 लाख 22 हजार 110 मेट्रिक टन इतके ऊस गाळप पूर्ण झाले आहे. या कारखान्यांनी सरासरी 9.76 टक्के सरासरी उताऱ्यानुसार 22 लाख 66 हजार 690 क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे, तर 5 खासगी कारखान्यांनी 23 लाख 94 हजार 440 मेट्रिक टन इतके ऊस गाळप पूर्ण केले आहे, तर 7.32 टक्के सरासरी उताऱ्यानुसार 17 लाख 53 हजार 486 क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केलेले आहे. सर्वाधिक ऊस गाळपात बारामती ॲग््राो लि. या खासगी साखर कारखान्यांनी आपली आघाडी कायम ठेवली आहे. या कारखान्याने 9 लाख 63 हजार 818 मे. टन इतके सर्वाधिक ऊस गाळप केले आहे, तर 7.47 टक्के उताऱ्यानुसार 7 लाख 17 हजार 400 क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे.
त्याखालोखाल ‘दौंड शुगर’ने 7 लाख 89 हजार 850 मे. टन ऊस गाळप पूर्ण करून दुसरे स्थान कायम ठेवले आहे, तर 7.48 टक्के उताऱ्यानुसार 5 लाख 80 हजार 850 क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 4 लाख 7 हजार 651 मे. टन ऊस गाळप केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 10.85 टक्के इतका निव्वळ साखर उतारा याच कारखान्याचा आहे. 4 लाख 39 हजार 50 क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे. दी माळेगांव सहकारी साखर कारखान्याने 3 लाख 95 हजार 355 मे. टन ऊस गाळप पूर्ण केले आहे, तर 10.52 टक्के उताऱ्यानुसार 4 लाख 8 हजार 600 क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे. याशिवाय उताऱ्यामध्ये ’श्री विघ्नहर सहकारी’चा 10.25 टक्के, ’श्री छत्रपती सहकारी’चा 10.18 टक्के, ’भीमाशंकर सहकारी’चा 10.01 टक्के साखर उतारा मिळाला आहे.
त्याखालोखाल ’दौंड शुगर’ने 7 लाख 89 हजार 850 मे. टन ऊस गाळप पूर्ण करून दुसरे स्थान कायम ठेवले आहे, तर 7.48 टक्के उताऱ्यानुसार 5 लाख 80 हजार 850 क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने 4 लाख 7 हजार 651 मे. टन ऊस गाळप केले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 10.85 टक्के इतका निव्वळ साखर उतारा याच कारखान्याचा आहे. 4 लाख 39 हजार 50 क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे. दी माळेगांव सहकारी साखर कारखान्याने 3 लाख 95 हजार 355 मे. टन ऊस गाळप पूर्ण केले आहे, तर 10.52 टक्के उताऱ्यानुसार 4 लाख 8 हजार 600 क्विंटल इतके साखर उत्पादन तयार केले आहे. याशिवाय उताऱ्यामध्ये ’श्री विघ्नहर सहकारी’चा 10.25 टक्के, ’श्री छत्रपती सहकारी’चा 10.18 टक्के, ’भीमाशंकर सहकारी’चा 10.01 टक्के साखर उतारा मिळाला आहे.