Pune MSRTC Extra Buses Summer: पुणे एसटी विभागाचा मोठा निर्णय; उन्हाळ्यात 74 अतिरिक्त बसगाड्या सुरू

प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी स्वारगेट, पुणे स्टेशन आणि वाकडेवाडीवरून विशेष नियोजन; कोकण व मराठवाडा मार्गांना दिलासा
ST Bus
ST BusPudhari
Published on
Updated on

पुणे: उन्हाळी सुट्यांमुळे एसटी बसस्थानकांवर उसळणारी प्रवाशांची अलोट गर्दी आता कमी होणार आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुलभ व्हावा, यासाठी एसटीच्या पुणे विभागाने कंबर कसली असून, विविध मार्गांवर 74 जादा गाड्या सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

ST Bus
Khadakwasla Fursungi Canal Project: खडकवासला–फुरसुंगी भूमिगत कालवा प्रकल्पाला गती; पाणीसाठ्यात बचत होणार

दरवर्षी उन्हाळ्यात कोकण, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाड्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. नियमित गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाल्यामुळे अनेक प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत होते. मात्र, आता या 74 अतिरिक्त गाड्यांमुळे प्रवाशांना गर्दीमुक्त प्रवास करता येणार आहे. प्रामुख्याने स्वारगेट, पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर (वाकडेवाडी) यासह विभागातील अन्य प्रमुख स्थानकांवरून या गाड्यांचे नियोजन केले आहे.

ST Bus
Bhatghar Dam Water Level: भाटघर व निरा देवघर धरणांत 37 टक्के पाणीसाठा; गतवर्षापेक्षा मोठी वाढ

उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांची गैरसोय होऊ नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे. गाड्यांची संख्या वाढवण्यासोबतच स्थानकांवर पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि सावलीची व्यवस्था करण्यावरही आम्ही भर देत आहोत. प्रवाशांनी सुरक्षित आणि किफायतशीर एसटी प्रवासाला प्राधान्य द्यावे. गर्दीच्या काळात शिस्त राखण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकही तैनात केले आहेत.

अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news