Khadakwasla Fursungi Canal Project: खडकवासला–फुरसुंगी भूमिगत कालवा प्रकल्पाला गती; पाणीसाठ्यात बचत होणार

28 किमी प्रकल्पातील पहिल्या 3 किमीचे काम पूर्ण; गळती व पाण्याचा अपव्यय रोखण्यास मदत
Khadakwasla Fursungi Canal Project
Khadakwasla Fursungi Canal ProjectPudhari
Published on
Updated on

वेल्हे: पुणे जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या खडकवासला ते फुरसुंगी भूमिगत कालवा प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आहे. खडकवासला येथून या प्रकल्पाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. पुणे शहराची वाढती पाण्याची गरज आणि वारंवार फुटणाऱ्या कालव्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जलसंपदा विभागाने हाती घेतलेल्या खडकवासला ते फुरसुंगी बंद कालव्याच्या कामाला आता गती मिळाली आहे.

Khadakwasla Fursungi Canal Project
Bhatghar Dam Water Level: भाटघर व निरा देवघर धरणांत 37 टक्के पाणीसाठा; गतवर्षापेक्षा मोठी वाढ

28 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पहिल्या 3 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्प पुढील 3 वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. उर्वरित 25 किमीचे काम तांत्रिक आव्हाने पार करून पुढील 3 वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

Khadakwasla Fursungi Canal Project
Pune Flyover Repair: हडपसर जुन्या उड्डाणपुलाच्या 6 कोटी दुरुस्तीवरून महापालिकेत वाद

या प्रकल्पामुळे बाष्पीभवन आणि गळती थांबून सुमारे पाण्याची बचत होणार आहे. उघड्या कालव्यामुळे पाण्यात कचरा टाकणे, प्रदूषण आणि अनधिकृत पाणीउपसा यांसारख्या समस्या निर्माण होत होत्या. बंद नलिकेमुळे आता शुद्ध पाणी थेट फुरसुंगीपर्यंत पोहोचणार आहे. तसेच, कालवा फुटण्याच्या संकटातून परिसरातील नागरिकांची कायमस्वरूपी सुटका होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सध्याचा कालवा ज्या जागेवरून जातो, ती जागा मोकळी होणार आहे. या जागेचा वापर रस्तेनिर्मितीसाठी केल्यास पुणे शहरातील, विशेषतः सिंहगड रस्ता आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news