पुणे-सोलापूर महामार्गावरील चौफुला चौकात बसथांबा नसल्याने प्रवाशांना त्रास

पुणे-सोलापूर महामार्गावरील चौफुला चौकात बसथांबा नसल्याने प्रवाशांना त्रास
Published on
Updated on

खोर(दौंड); पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावरील चौफुला चौकातून प्रवास करणार्‍यांची अवस्था उन्हामुळे बिकट होत आहे. या चौकात बसथांबा शेड नसल्याने तरुणांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांनाच भर रस्त्यावर कडक उन्हाळ्याच्या झळा अंगावर घेत उभे राहावे लागत आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांना सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने चौफुला चौकात सध्या बाहेरगावी जाण्यासाठी मोठी गर्दी जमा होत आहे. परिणामी, याठिकाणी बसथांब्यावर प्रवाशांना कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी महामार्गांवर कुठल्याही प्रकाराचा निवारा नाही.
दौंड प्रशासन विभागाने याबाबतीतील दखल घेऊन चौफुला चौकातील बसथांबा परिसरात प्रवासीवर्गाची होणारी गैरसोय टाळण्यासाठी या चौकात शेड उभारणे सध्या काळाची गरज बनली गेली आहे.

दौंड तालुक्यातील बोरीपार्धी-चौफुला येथून पुणे-सोलापूर महामार्ग व शिरूर-सातारा महामार्ग जातात. येथून प्रवास करणार्‍यांची संख्या मोठी आहे. येथे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना ऊन, वारा व पावसात एसटीची वाट पाहत उभे राहावे लागते. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही येथे एसटी पिकअप शेड उभारण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित खात्याने याकडे लक्ष द्यावे व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी.

                                    – कानिफनाथ मांडगे, प्रवासी, केडगाव

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news