Pune Silent March: नसरापूर घटनेविरोधात पुण्यात भव्य मूक मोर्चा

आरोपीला फाशीची मागणी; पीडितेला तातडीने न्याय मिळावा अशी नागरिकांची मागणी
Pune Silent March
Pune Silent MarchPudhari
Published on
Updated on

पुणे: नसरापूर येथे एका चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेतील आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, या मागणीसाठी रविवारी (दि. 10) सायंकाळी पुणेकर जनतेच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. आरोपीला फाशी द्या आणि पीडितेला न्याय द्या, अशा घोषणांचे फलक हाती घेऊन असंख्य पुणेकर या मूक मोर्चात सहभागी झाले होते.

Pune Silent March
Pune Heatwave: पुणे तापले! 41 अंशांवर पारा, उकाड्याने नागरिक हैराण

या मोर्चाची सुरुवात सायंकाळी झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक (बालगंधर्व रंगमंदिर) येथून झाली. जंगली महाराज रस्त्यावरून मार्गक्रमण करत हा मोर्चा कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकापर्यंत काढण्यात आला. या आंदोलनात महिला, युवती आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता.

Pune Silent March
Pune Vegetable Market Prices: पाणीटंचाईचा फटका! पुण्यात घेवडा, गवार, ढोबळी मिरचीच्या दरात वाढ

महिलांच्या चेहऱ्यावर या घटनेबद्दलचा तीव संताप आणि दुःख स्पष्टपणे जाणवत होते. कोणत्याही मोठ्या आवाजात घोषणाबाजी न करता, केवळ हातात फलक धरून पुणेकरांनी आपला निषेध शांततेत पण प्रभावीपणे नोंदवला.

Pune Silent March
Pune Fruit Market Prices: कच्च्या लिंबाला ग्राहकांची नापसंती; पुण्यात लिंबाच्या भावात मोठी घसरण

नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्या आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पीडितेच्या कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. मोर्चाचा समारोप स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकासमोर झाला.

Pune Silent March
Pune Bhusar Market Prices: उन्हाच्या तडाख्यामुळे पुणे भुसार बाजारात मंदी; शेंगदाणा, भगरी महागली

या वेळी उपस्थित जनसमुदायाने स्मारकासमोर बसून, आपला निषेध व्यक्त केला. अशा घटना समाजात पुन्हा घडू नयेत, यासाठी कायद्याचा वचक निर्माण होणे गरजेचे आहे, अशी भावना या वेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news