Shrigonda Illegal Liquor | विधानसभेत हातभट्टीविरोधात आवाज उठवणाऱ्या आमदाराच्या श्रीगोंदा मतदारसंघातच दारूचा महापूर

घोड नदी काठावरील श्रीगोंदा तालुक्यातील स्थिती
 Illegal Liquor Supply
Illegal Liquor Supply AI Photo
Published on
Updated on

Pune Shirur Illegal Liquor Supply

निमोणे : शिरूर तालुक्याचा पूर्व भाग आणि रांजणगाव एमआयडीसी आदी परिसराला गावठी दारू पुरवणाऱ्या हातभट्टया या घोड नदीच्या काठावर श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत आहेत. गावठी दारू बंद करा, ते रॅकेट उद्ध्वस्त करा, अशा पद्धतीची लक्षवेधी श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेमध्ये मांडली होती. सात-आठ महिने लोटले अद्यापही पाचपुते यांच्याच मतदारसंघातील हातभट्टी दारूचे रॅकेट उध्वस्त करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले नाही, असेच दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्याची हद्द ही घोड नदीच्या काठापासून सुरू होते. हा परिसर भौगोलिकदृष्ट्या शिरूर शहराशी अगदी जवळ आहे. बेलवंडी पोलिस ठाण्यापासून हा परिसर दुर्लक्षित असल्यामुळे नदी काठावर अडगळीच्या जागा या हातभट्ट्या दारूचे आगार झाले आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग व बेलवंडी पोलिस ठाण्याच्या पथकाने नदीकाठच्या परिसरात छापेमारी करून अनेक हातभट्ट्या उध्वस्त केल्या; मात्र हे करण्यासाठी पुण्यासारख्या शहरात २२ जणांना आपला जीव गमावा लागला.

 Illegal Liquor Supply
Pune HSRP Number Plate: पुण्यात 9.45 लाख वाहनांवर HSRP नंबरप्लेट; नियम मोडणाऱ्यांवर आरटीओची कारवाई सुरू

शिरूर तालुक्यातील गावठी दारूची साखळी तोडायची असेल तर हद्दीचा बागुलबुवा उभा न करता दोन्ही तालुक्यातील पोलिस यंत्रणेला संयुक्त कारवाई करत या हातभट्ट्या उध्वस्त कराव्या लागणार आहेत, हे नक्की. आमदार पाचपुते यांच्या लक्षवेधीनंतरही जर त्यांच्याच मतदारसंघातील नदीकाठच्या अनेक गावात हातभट्ट्या धडधडत असतील तर हे अत्यंत चिंताजनक आहे.

शिरूर आणि श्रीगोंदा या दोन्ही ही तालुक्यातील नदीकाठच्या परिसरात वीट भट्टी आणि हातभट्टी यांचे वेगळच समीकरण जुळून आले आहे. वीट भट्टीवरील कामगार हा हातभट्टीचा खात्रीलायक ग्राहक असल्याने हातभट्टी व्यवसाय हा सात महिने प्रचंड तेजीत असतो. दरम्यान एक लोकप्रतिनिधी विधानसभेत भूमिका घेऊन ही हातभट्ट्या कायमच्या उध्वस्त होत नसतील तर यामागे काय गौडबंगाल आहे हेच कळायला मार्ग नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news