Pune Navratri Festival 2026: पुण्यात आजपासून शारदीय नवरात्रोत्सव; देवीच्या मंदिरांत जय्यत तयारी, दांडिया-गरबाचा रंग

घटस्थापनेने उत्सवाला प्रारंभ; शहर-उपनगरांत विद्युत रोषणाई, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची दहा दिवस रेलचेल
Ghatasthapana
GhatasthapanaPudhari
Published on: 
Updated on: 

पुणे: ‘उदे गं अंबे उदे... जय अंबे गौरी!’च्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर, विद्युत रोषणाईने उजळलेली मंदिरे, आदिशक्तीच्या स्वागतासाठी सजलेली घरे अन्‌ घटस्थापनेसाठी महिला-युवतींनी केलेली जय्यत तयारी, असे चैतन्यपूर्ण वातावरण शहर आणि उपनगरांत पाहायला मिळत आहे. रविवारी (दि. ११) शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असून, आदिशक्तीच्या आगमनासाठी शहर आणि उपनगरांतील मंदिरांसह मंडळे, सोसायट्या आणि घराघरांत तयारी पूर्ण झाली आहे. कुठे पारंपरिक पद्धतीने घटस्थापनेची तयारी, तर कुठे मंदिरांच्या आकर्षक प्रतिकृती आणि सामाजिक संदेश देणारे देखावे, असे उत्सवाचे विविध रंग पाहायला मिळणार आहेत. पुढील दहा दिवस देवीच्या आराधनेसह भजन-कीर्तन, प्रवचन, भक्तिगीतांचे कार्यक्रम आणि दांडिया-गरबाच्या कार्यक्रमांनी पुणेकरांच्या उत्साहाला उधाण येणार आहे. उत्सवात देवीचा जागर होणार असून, भक्ती, शक्ती आणि उत्साहाचा त्रिवेणी संगम अनुभवता येणार आहे.

Ghatasthapana
Pune Navratri Festival 2026: पुणे नवरात्रौ महोत्सव आजपासून; गीतांची मैफल, हास्यकल्लोळ अन् लावणीचा ठेका

शक्ती, श्रद्धा आणि चैतन्याचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीच्या उपासनेला भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रोत्सवात आदिशक्तीचा जागर होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवानिमित्त देवीच्या मंदिरांमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे. फुलांचे तोरणे, रंगीबिरंगी पताके, आकर्षक विद्युत रोषणाई आणि सुंदर सजावटीमुळे मंदिरांचे रूप पालटले आहे. रविवारी (दि. ११) सकाळी अभिषेक, पूजा-अर्चा आणि विधिवत पद्धतीने घटस्थापनेनंतर आरती होईल. काही मंदिरांमध्ये पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणुका काढण्यात येणार आहेत. मंदिरे दर्शनासाठी दिवसभर खुली राहणार आहेत. गर्दीचे नियोजन आणि सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक तसेच पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Ghatasthapana
Fake Kurash Certificates: कुराशच्या बनावट प्रमाणपत्रांचे धागेदोरे इतर सरकारी भरतींपर्यंत? हजाराहून अधिक प्रमाणपत्रांचा दावा

धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनीही आकर्षक मंडप, फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने परिसर सजविला आहे. घटस्थापनेनंतर मंडळांच्या ठिकाणी दहा दिवस धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. शहरातील विविध मैदाने, लॉन्स आणि सभागृहांमध्ये रविवारी पहिल्याच दिवशी दांडिया-गरबाचे कार्यक्रम रंगणार आहेत. गृहनिर्माण सोसायट्यांमध्येही पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आदिशक्तीच्या आगमानासाठी पुणेकर सज्ज आहेत.

Ghatasthapana
Pune Navratri 2026: पुण्यातील देवी मंदिरांत उद्यापासून नवरात्रोत्सवाचा जागर; चतु:शृंगी मंदिरात २४ तास दर्शन

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने शनिवारी (दि. १०) उत्सवाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. घराघरांत घटस्थापनेसाठी फुले, हार, पूजेचे साहित्य खरेदी करण्यात आले. उत्सवासाठी घराघरांमध्ये आकर्षक मखर, फुलांची आरास आणि रोषणाई करण्यात आली आहे. काही घरांमध्ये मंदिरांच्या प्रतिकृती, पारंपरिक सजावट, तर काही ठिकाणी सामाजिक विषयांवर आधारित देखावे साकारण्यात आले आहेत. महिला आणि युवती पारंपरिक मराठमोळ्या पेहरावात रविवारी घटस्थापना करणार असून, उपवास, नैवेद्य आणि आरतीतून देवीची भक्तिभावाने आराधना केली जाणार आहे. महिला-युवतींकडून नऊ दिवसांचे उपवासही करण्यात येणार आहेत.

Ghatasthapana
Pune Youth Mental Health: ससूनमध्ये दररोज आत्महत्येचा प्रयत्न केलेले ४ ते ५ तरुण उपचारासाठी; मानसिक आरोग्याचा प्रश्न गंभीर

देवीच्या मंदिरांमध्ये उत्सवाची तयारी पूर्ण

ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी (बुधवार पेठ), चतु:शृंगी देवी (सेनापती बापट रस्ता), महालक्ष्मी मंदिर (सारसबागेसमोर), भवानी देवी मंदिर (भवानी पेठ), तळजाई माता मंदिर (तळजाई टेकडी, सहकारनगर), काळी जोगेश्वरी (बुधवार पेठ), पिवळी जोगेश्वरी (शुक्रवार पेठ) आणि वनदेवी मंदिर (कर्वेनगर) या मंदिरांसह शहर आणि उपनगरांतील विविध देवींच्या मंदिरांत नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रविवारी सकाळी घटस्थापना, पूजा-अर्चा आणि आरतीने उत्सवाला प्रारंभ होईल. पुढील दिवसांत धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मंदिरांचा परिसर भक्तिमय होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news