Cyber Fraud: दहशतवादी संघटनेचा धाक दाखवून पुण्यातील ज्येष्ठाची ९९ लाखांची फसवणूक!

सायबर चोरट्यांनी ‘तुमचा दहशतवाद्यांशी संबंध आहे’ अशी भीती दाखवत ७३ वर्षीय निवृत्त नागरिकाची ९९ लाखांची फसवणूक केली; सायबर पोलिसांकडून तपास सुरू
Cyber Fraud
Cyber FraudPudhari
Published on
Updated on

पुणे: दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाची ९९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cyber Fraud
Book Price Hike: 250 रुपयांचे पुस्तक जीएसटी वाढीनंतर किती रुपयांना मिळणार?

याबाबत कसबा पेठेतील एका ज्येष्ठ नागरिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cyber Fraud
Fake Police Officer Arrested: तोतया पोलिसाचा पर्दाफाश! महिलांना फसवणाऱ्या सराईत ठगाला भिगवण पोलिसांनी पकडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कसबा पेठेतील मेट्रो स्थानक परिसरात राहायला आहेत. ते सेवानिवृत्त आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर ३ ऑक्टोबर रोजी संपर्क साधला. चोरट्यांनी बंदी घातलेल्या एका दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची भीती त्यांना दाखविली. दहशतवादी कारवायांशी बँक खात्यातून पैसे पाठविण्यात आल्याची बतावणी करून याप्रकरणात अटक केली जाण्याची शक्यता आहे, अशी भीती दाखवून चोरट्यांनी तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले.

Cyber Fraud
Grape crop failure Ambegaon: द्राक्षाला घडनिर्मिती न झाल्याने बागायतदार हवालदिल

चोरट्यांनी भीती दाखविल्यानंतर ज्येष्ठ नागरिक घाबरले. त्यांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ९९ लाख रुपये जमा केले. आठवडभरात त्यांनी जवळपास खात्यातील सर्व रक्कम चाेरट्यांच्या खात्यात जमा केली. त्यानंतरही चोरट्यांकडून पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याबाबत सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.

Cyber Fraud
Yavat Cattle Market: यवतला 10 वर्षांनंतर जनावरांचा बाजार सुरू

प्रकार वाढीस लागले...

गेल्या काही महिन्यांपासून सायबर चोरट्यांकडून तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. शनिवार पेठ, कोथरूड भागातील ज्येष्ठ नागरिकांची नुकतीच फसवणूक करण्यात आली. सक्त वसुली संचालनालय (ईडी), अमली पदार्थ विरोधी पथक (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) कारवाई करण्यात येणार असल्याची बतावणी करून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news