

पुणे : वाहनांवरील प्रलंबित ई-चलन भरण्यासंदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे यांच्या नावाने नागरिकांना बनावट मेसेज येत असल्याची माहिती समोर आली आहे.
या मेसेजमध्ये दंड भरण्यासाठी तत्काळ एका लिंकवर क्लिक करण्याचा इशारा दिला जातो, अन्यथा कट-ऑफ करण्याची धमकी दिली जाते. हा एक सुनियोजित ई-चलन फसवणूक घोटाळा असून, आरटीओ प्रशासनाने याबद्दल तातडीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या अधिकृत वृत्त निवेदनात प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे प्रलंबित ई-चलन किंवा दंडाच्या रकमेबाबत अशा कोणत्याही धमकीचे मेसेज किंवा खासगी लिंक नागरिकांना पाठवत नाही.
किंवा तत्सम कोणत्याही लिंकवर क्लिक करून दंड भरण्याचा प्रयत्न नागरिकांनी करू नये, कारण ही लिंक सायबर चोरट्यांनी नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्यासाठी तयार केली आहे, असे सांगितले आहे.