MBBS BDS Admission 2026: MBBS-BDS प्रवेशाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर; हरकतीसाठी आज शेवटची संधी

१९ ते २० ऑगस्ट सायंकाळी ५ वाजेपर्यंतच नोंदविता येणार हरकत; अंतिम गुणवत्ता यादीत बदलाची संधी नाही
Medical Admission
Medical AdmissionPudhari File photo
Published on
Updated on

पुणे: एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारांची तात्पुरती गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. तात्पुरत्या गुणवत्ता यादीमध्ये प्रसिद्ध झालेल्या केवळ स्वतःच्या तपशिलांबाबत उमेदवारांना १९ ते २० ऑगस्टदरम्यान सायंकाळी ५ वाजेपर्यंत तक्रार/ हरकत नोंदविता येणार असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

Medical Admission
Farmer Friends ATMA Scheme: राज्यात ११,५८७ ‘शेतकरी मित्र’ निवडणार; दरमहा १,५०० रुपये मानधन

उमेदवारांनी तात्पुरत्या गुणवत्ता यादीत प्रसिद्ध झालेला नावाचा तपशील, प्रवर्ग, लिंग, गुण व इतर संबंधित तपशील काळजीपूर्वक तपासावा आणि लॉगिनद्वारे तक्रार/हरकत नोंदवावी. ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही. उमेदवारांना फक्त एकदाच तक्रार/ हरकत नोंदविता येईल. एकाच तक्रारीमध्ये एकापेक्षा अधिक बाबींविषयी हरकत नोंदविता येईल.

Medical Admission
Pune Cycle Race Road Tender: सायकल स्पर्धेसाठी ६२७ कोटींचे रस्ते; ‘मर्जीतील’ ठेकेदारांसाठी नियम शिथिल करण्याचा घाट?

उमेदवारांनी तक्रार/ हरकत सादर करण्यापूर्वी सर्व तपशील काळजीपूर्वक तपासून आवश्यक त्या सर्व बाबींविषयी हरकत नोंदविल्याची खात्री करावी. एकदा तक्रार/ हरकत सादर केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही, तसेच कोणतीही बाब समाविष्ट किंवा वगळता येणार नाही. नोंदणी अर्जामध्ये सादर केलेल्या तपशिलामध्ये दुरुस्ती/ बदल करण्याची मागणी असल्यास, त्या मागणीच्या समर्थनार्थ आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य राहील.

Medical Admission
Junnar Crime: चिमुकलीवरील अत्याचारानंतर पिंपळवंडीत संतापाचा उद्रेक; पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको

आवश्यक कागदपत्रांशिवाय केलेल्या दुरुस्तीच्या मागणीचा विचार करण्यात येणार नाही. आवश्यक समर्थनार्थ कागदपत्रे अपलोड न करणाऱ्या उमेदवारांचा संबंधित दावा मान्य करण्यात येणार नाही. केवळ कागदपत्रे अपलोड केल्याने संबंधित बदलास आपोआप मान्यता मिळणार नाही. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच संबंधित दावा/ बदल ग्राह्य धरला जाईल. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ योग्य व वैध कागदपत्रेच अपलोड करावीत.

Medical Admission
Professional Colleges Scholarship Fee: शिष्यवृत्तीची रक्कम वजा न करता विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्काची वसुली; महाविद्यालयांची मनमानी

खुल्या प्रवर्गातून आरक्षण अथवा अल्पसंख्याक इत्यादी प्रवर्गामध्ये बदल करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी माहिती पुस्तिकेमध्ये नमूद केल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांच्या आधारे तक्रार/ हरकत नोंदवावी. अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. अंतिम गुणवत्ता यादीचा उपयोग पहिल्या दोन फेऱ्यांसाठी करण्यात येणार असल्याचे सीईटी सेलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news