Pune RMC Pollution: पुण्यात RMC प्रदूषणावर कारवाई; आयुक्तांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

नियमभंग करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाईचा इशारा; MPCB अधिकाऱ्यांचीही साथ
Factory Pollution
Factory PollutionPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांमुळे वाढलेल्या प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी स्वतः पुढाकार घेतला आहे. पुढील आठवड्यात ते महापालिका हद्दीतील विविध आरएमसी प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करणार असून, या दौऱ्यात महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही सहभागी होणार आहेत.

Factory Pollution
Pune Waste Picker Working Conditions: पुण्यात कचरावेचकांचे उन्हात हाल; कामाच्या वेळेत मोठा बदल

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर पाहणीनंतर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वडगाव खुर्द, धायरी, बावधन, लोहगाव, उंड्री, शेवाळवाडी आदी भागांत मोठ्या प्रमाणात आरएमसी प्रकल्प उभे राहिले आहेत.

Factory Pollution
Pune Summer Travel Rush: उन्हाळी सुट्यांचा ‘गावाकडे ओघ’; स्वारगेट बसस्थानकावर गर्दी उसळली

या प्रकल्पांमुळे परिसरात धूळ व प्रदूषणाचे प्रमाण वाढले असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. काही ठिकाणी सिमेंटयुक्त राडारोडा व रासायनिक स्लरी थेट मुठा नदीत सोडली जात असल्याने नदीच्या पाण्याचा रंग बदलल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Factory Pollution
Pune Crime: बिबवेवाडीत महिलेचे टोकाचे पाऊल; जीम ट्रेनरसह 2 जणांना अटक

दरम्यान, आरएमसी प्रकल्पांवरील कारवाईचा मुद्दा गेल्या काही दिवसांत चांगलाच गाजला आहे. लोहगाव-खांदवेनगर परिसरातील सात प्रकल्पांवर महापालिकेने कारवाई केली होती. त्यानंतर वडगाव खुर्द येथील प्रकल्पांवर कारवाईचे नियोजन असतानाच ती माहिती लीक झाल्याने कारवाई रद्द केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.

Factory Pollution
MSEDCL Solar Charges Controversy: महावितरणच्या ‘ग्रिड सपोर्ट चार्जेस’मुळे सौरऊर्जा क्षेत्र संकटात

आरएमसी प्रकल्पांची आवश्यकता मान्य असली तरी ते नियमांनुसारच चालले पाहिजेत. नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी प्रदूषण नियंत्रणाच्या सर्व निकषांचे पालन आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्यक्ष पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news