पुणेकरांची संकष्टीमुळे चिकन, मासळीकडे पाठ

पुणेकरांची संकष्टीमुळे चिकन, मासळीकडे पाठ

पुणे : संकष्ट चतुर्थी तसेच मागील आठवड्यात हनुमान जयंतीमुळे बाजारात चिकन, मटण व मासळीला मागणी कमी राहिली. बाजारात होत असलेल्या मागणीइतकाच माल मागविण्यात येत असल्याने त्यांचे भावही गत आठवड्याच्या तुलनेत टिकून असल्याचे सांगण्यात आले. मागणीअभावी गावरान अंड्यांचे भाव शेकड्यामागे 30 रुपये, तर इंग्लिश अंडी 38 रुपयांनी उतरल्याचे सांगण्यात आले.
गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (दि. 9) खोल समुद्रातील मासळीची 10 ते 12 टन, खाडी 200 ते 300 किलो, तर नदीच्या मासळीची 150 ते 200 किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे 10 ते 12 टन इतकी आवक झाली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) – पापलेट : कापरी : 1600, मोठे : 1500, मध्यम : 1200-1400, लहान : 950-1000, भिला : 600-700, हलवा : 700-800, सुरमई : 600-700, रावस : 700-750, घोळ : 800-850, करली : 320-360, करंदी (सोललेली) : 400-440, भिंग : 360-400, पाला : 1000-1200, वाम : काळी 360-400 पिवळी 800-900, ओले बोंबील : 240-280. कोळंबी : लहान 200-300, मोठी : 360-480, जंबोप्रॉन्स : 1400, किंगप्रॉन्स : 700-750, लॉबस्टर : 1800-2000, मोरी : 300-360, मांदेली : 100-140, राणीमासा : 200-240, खेकडे : 240-280, चिंबोर्‍या : 550-600.

खाडीची मासळी : सौंदाळे : 200-240, खापी : 240-300, नगली : 240-280, तांबोशी : 400-440, पालू : 200-240, लेपा : 200-240, बांगडा : लहान 100-120 मोठा 140-160, शेवटे : 200-240, पेडवी : 100-120, बेळुंजी : 140-160, खुबे : 100-140, तिसर्‍या : 200-240 तारली : 120. नदीतील मासळी : रहू : 160-200, कतला : 160-200, मरळ : 400-440, शिवडा : 240-280, खवली : 280-320, आम्ळी : 140-180, खेकडे : 400-480, वाम : 500-550. मटण : बोकडाचे : 700, बोल्हाई : 700, खिमा : 700, कलेजी : 740, चिकन : 200, लेगपीस : 250, जिवंत कोंबडी : 140, बोनलेस : 300. अंडी : गावरान (शेकडा) 890, डझन 120, प्रतिनग 10. इंग्लिश (शेकडा) 415, डझन 60, प्रतिनग 5.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news