Pune DJ Loudspeaker Noise Protest: डीजेच्या दणदणाटाविरोधात पुणेकरांचा एल्गार! उद्या रस्त्यावर उतरणार; थेट महापालिकेवर धडक

Pune DJ Loudspeaker Noise Protest: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि लाऊडस्पीकरच्या कर्णकर्कश आवाजाविरोधात पुणेकर रविवारी रस्त्यावर उतरणार आहेत.
Pune DJ Loudspeaker Noise Protest
Pune DJ Loudspeaker Noise ProtestPudhari
Published on
Updated on

Pune DJ Loudspeaker Noise Protest: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे, लाऊडस्पीकर आणि ध्वनीक्षेपकांच्या वाढत्या आवाजाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कर्णकर्कश आवाजामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याच्या मागणीसाठी पुण्यातील नागरिक आता रस्त्यावर उतरणार आहेत. 'पुणेकर अगेन्स्ट लाऊडस्पीकर' (लाऊडस्पीकर विरोधी पुणेकर मंच) यांच्या वतीने रविवारी (६ सप्टेंबर) पुण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मोर्चा सकाळी ११ वाजता बालगंधर्व रंगमंदिर चौकातून सुरू होणार असून झाशीची राणी पुतळा मार्गे पुणे महानगरपालिका भवनापर्यंत काढण्यात येणार आहे. डीजे आणि लाऊडस्पीकरच्या कर्णकर्कश आवाजावर निर्बंध आणावेत, तसेच ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी या माध्यमातून केली जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या आधी नागरिक आक्रमक

गणेशोत्सवाला आता काहीच दिवस शिल्लक असल्याने पुण्यासह राज्यभरात उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. गणेश मंडळांच्या मिरवणुका, ढोल-ताशे, डीजे, ध्वनीक्षेपक तसेच लेझर शो यामुळे दरवर्षी ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर येतो. यंदाच्या गणेशोत्सवातही डीजेच्या आवाजाचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर पुण्यातील विद्यानंद बापट यांनी गणेशोत्सवादरम्यान डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्याने त्यांची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या भूमिकेमुळे डीजेच्या आवाजाविरोधातील नागरिकांच्या मागण्यांना पुन्हा एकदा व्यापक व्यासपीठ मिळाले आहे.

Pune DJ Loudspeaker Noise Protest
Pune DJ Loudspeaker Noise ProtestPudhari

नागपुरात डीजे-डॉल्बीवर बंदी

दरम्यान, नागपुरात गणेश मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या डीजे आणि डॉल्बी साऊंड सिस्टीमवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. ही बंदी ३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून १ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

नागपुरातील या निर्णयानंतर डीजे आणि डॉल्बीच्या मोठ्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याच्या मागणीला राज्यातील इतर शहरांमध्येही पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील प्रस्तावित मोर्चाकडे त्यामुळे विशेष लक्ष लागले आहे.

Pune DJ Loudspeaker Noise Protest
Shalarth ID Teachers: २० टक्के अनुदानित शाळांतील शिक्षकांना शालार्थ आयडी द्या; विलंब झाल्यास शिस्तभंगाची कारवाई

पुणेकरांच्या प्रमुख मागण्या काय?

कर्णकर्कश डीजे आणि लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर कठोर नियंत्रण ठेवावे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि नागरिकांना शांततापूर्ण वातावरण मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Pune DJ Loudspeaker Noise Protest
Pune Accident: क्षणात होत्याचं नव्हतं! दहीहंडीचा लोखंडी सांगाडा डोक्यावर पडला, महिलेचा दुर्दैवी मृत्यू, मुलगा मंडळाचा कार्यकर्ता

मोर्चाची माहिती :

  • दिनांक: रविवार, ६ सप्टेंबर २०२६

  • वेळ: सकाळी ११ वाजता

  • प्रारंभ: बालगंधर्व रंगमंदिर चौक, पुणे

  • मार्ग: बालगंधर्व रंगमंदिर चौक ते पुणे महानगरपालिका भवन

  • आयोजक: पुणेकर अगेन्स्ट लाऊडस्पीकर मंच

गणेशोत्सव तोंडावर असताना डीजे आणि लाऊडस्पीकरच्या आवाजाचा प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या या मोर्चातून पुणेकरांचा आवाज प्रशासनापर्यंत किती प्रभावीपणे पोहोचतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news