Pune Conversion Case: पुण्यात चर्चमधील प्रवचनावरून खळबळ; धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न, ब्रिटिश नागरिकाविरोधात गुन्हा दाखल

Pune Religious Conversion Case: पुण्यातील गुरुवार पेठेतील चर्चमध्ये प्रवचनाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केल्याचा आरोप करत एका ब्रिटिश नागरिकाविरोधात खडक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Religious Conversion Case
Pune Religious Conversion CasePudhari
Published on
Updated on

Pune Religious Conversion Case: पुण्यातील गुरुवार पेठ परिसरातील एका चर्चमध्ये प्रवचनाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांकडून पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर खडक पोलिसांनी ब्रिटिश नागरिक असलेल्या एका धर्मगुरूविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियमाला विधिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या कायद्यांतर्गत पुण्यात दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यांपैकी हे प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ब्रिटिश नागरिक गेल्या काही दिवसांपासून पुण्यात वास्तव्यास आहे. गुरुवार पेठेतील चर्चमध्ये त्याच्याकडून प्रवचन आणि धार्मिक कार्यक्रम घेतले जात असल्याची माहिती समोर आली. मात्र, या कार्यक्रमांच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप काही हिंदुत्ववादी संघटनांनी केला. त्यानंतर या संघटनांच्या प्रतिनिधींनी खडक पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्रवचनादरम्यान नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या धार्मिक बाबी सांगण्यात आल्या, त्यातून धर्मपरिवर्तनासाठी कोणते प्रयत्न करण्यात आले का, तसेच संबंधित व्यक्तीला भारतात वास्तव्यास असताना धार्मिक प्रचार किंवा प्रवचन करण्यास परवानगी होती का, याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, संबंधित व्यक्ती ब्रिटिश नागरिक असून तो पुण्यातील चर्चमध्ये प्रवचन आणि भजनाच्या माध्यमातून धार्मिक कार्यक्रम घेत होता. परदेशी नागरिकांच्या भारतातील वास्तव्याच्या अटी आणि त्यांना धार्मिक प्रचार किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यास असलेले नियम याबाबतही तपास केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

Pune Religious Conversion Case
Pune-Satara Highway Accident: पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; कार डिव्हायडर ओलांडून ट्रकला धडकली, चौघांचा जागीच मृत्यू

दरम्यान, महाराष्ट्रात धर्मांतरासंदर्भातील नव्या कायद्याला विधिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत चर्चा सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात दाखल झालेल्या या गुन्ह्याकडे विशेष लक्ष लागले आहे.

Pune Religious Conversion Case
Pune Crime : उरुळी कांचनमध्ये सावकाराचा धक्कादायक कारनामा! लाखो रुपये वसूल करूनही पैशांसाठी तगादा; पोलीस ठाण्यातच महिलेला धमकी

मात्र, संबंधित व्यक्तीने प्रत्यक्षात धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केला होता का, प्रवचनामध्ये नेमके काय सांगण्यात आले आणि या प्रकरणात कायद्याच्या कोणत्या तरतुदी लागू होतात, हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या या प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू असून खडक पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news