Pune Rapido Fir: बेकायदा प्रवासी वाहतूकप्रकरणी 'रॅपिडो'विरुद्ध गुन्हा

विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे
Rapido
Rapido(file photo)
Published on: 
Updated on: 

पुणे : बेकायदा प्रवासी वाहतूकप्रकरणी रोपेन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. (रॅपिडो) कंपनीविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मोटार वाहन निरीक्षक प्रसाद सुरवसे यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी 'रॅपिडो' कंपनीविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३१८ (३), मोटार वाहन कायदा, माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) 'बाईक टॅक्सी'ला (पेट्रोल इंजिन असलेली दुचाकी) प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली नाही. 'रॅपिडो' कंपनीकडून प्रवासी वाहतुकीबाबतचे ॲप तयार करण्यात आले.

या ॲपद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून प्रवासी वाहतूक करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पोलिसांकडे तक्रार दिली. बेकायदा प्रवासी वाहतूक करून शासनाची फसवणूक केल्याचे मोटार वाहन निरीक्षक सुरवसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक राऊत तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news