Pune Rain Update | पुरंदरमधील गराडे धरण १०० टक्के भरले

धरणात ६५ एमसीएफटी पाणीसाठा
Garade Dam in Purandar
पुरंदरमधील गराडे धरण १०० टक्के भरले आहे. file photo

सासवड : पुरंदर तालुक्याचे शहर असलेल्या सासवडसह पाच गावांना पाणीपुरवठा करणारे गराडे धरण बुधवारी शंभर टक्के भरले. धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरु झाला आहे.

मागील चार-पाच दिवसापासून पुरंदरच्या पश्चिम भागात म्हणजेच पुरंदर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे गराडे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून पाणी नदी पात्रात जाऊ लागले आहे. पुरंदरच्या पश्चिम भागातील जनतेला यामुळे दिलासा मिळाला आहे. कऱ्हा नदी वाहू लागल्याने या नदीमधून पाणी आता नाझरे धरणात येणार आहे. मागील सहा ते सात महिन्यापासून नाझरे धरण कोरडे असून नाझरे धरणात पाणी आले तर पुरंदरसह बारामतीतील ७२ वाड्यावस्ती आणि गावांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो.

Garade Dam in Purandar
कोल्‍हापूरकरांचं टेन्शन वाढलं : पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल

दरम्यान, गराडे धरण पूर्णपणे भरल्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे आणि गराडेचे सरपंच नवनाथ गायकवाड, यांनी या पाण्याचे पूजन केले. यावेळी भाजपचे युवा नेते जालिंदर जगताप, चांबळीचे सरपंच प्रतिभाताई कदम, उपसरपंच संजय कामठे, प्रगतशील शेतकरी शिवाजी बापू जगदाळे, गोकुळआण्णा जगदाळे, माजी उपसरपंच नितीन जगदाळे, भाऊसाहेब रावडे, माजी उपसरपंच दत्तात्रय जगदाळे, अविनाश जगदाळे, शहाजी कामठे, मयुर जगदाळे, मारुती कामठे, प्रकाश शेंडकर, म्हस्कू कामठे, आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news