Pune Railway Station Holi Rush: होळी गर्दीवर नियंत्रणासाठी पुणे रेल्वेस्थानकावर स्वतंत्र ‘होल्डिंग एरिया’

विशेष गाड्या, अतिरिक्त तिकीट काऊंटर व कडक सुरक्षा व्यवस्थेसह रेल्वे प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर
Pune Railway Station Holi Rush
Pune Railway Station Holi RushPudhari
Published on
Updated on

पुणे: होळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची पुणे रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी होते. हे लक्षात घेऊन, रेल्वेची यंत्रणा आता ॲक्टिव्ह मोडवर आल्याचे चित्र सोमवारी (दि. 23) पाहायला मिळाले.

Pune Railway Station Holi Rush
Pune Murders Causes: किरकोळ वाद, प्रेमसंबंध आणि घरगुती तणावांचा गंभीर परिणाम

रेल्वेस्थानक प्लॅटफॉर्मलगत असलेल्या पार्सल विभागाशेजारी प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी ‌‘होल्िंडग एरिया‌’ उभारला आहे, या कक्षात उत्तरेकडेसह अन्य भागांत जाणाऱ्या होळी विशेष गाड्यांच्या प्रवाशांना थांबवण्याची व्यवस्था केली आहे. स्थानकावर होणाऱ्या अतिरिक्त गर्दीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता हे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Pune Railway Station Holi Rush
Bhigwan Flamingos: भिगवण जलाशयावर फ्लेमिंगो पक्ष्यांचा अलौकिक नजारा

मागील काही वर्षांपूर्वी पुणे रेल्वेस्थानकावर झालेल्या गर्दीत गुदमरल्यामुळे एका व्यक्तीचे प्राण गेले होते. तशीच घटना मुंबईतही घडली होती, अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आता विशेष तयारी केली जात आहे, अशीच तयारी सध्या रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे रेल्वेस्थानकावर सुरू आहे. या तयारीमुळे होळीबरोबरच दसरा, दिवाळी, छठपूजेसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वेस्थानकावर होणारी गर्दी रोखण्यात प्रशासनाला यश मिळत आहे. तसेच, गर्दीमुळे होणारी चेंगरा-चेंगरीसारखी दुर्घटना टाळण्यास देखील मोठी मदत होत आहे. त्यामुळे प्रशासनाने यंदा होळीसाठीही असेच नियोजन केले आहे.

Pune Railway Station Holi Rush
Hanumant Pawar: काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण, पुण्यातील धक्कादायक घटना; CCTV Video समोर

होल्िंडग एरियात कोणत्या आहेत सुविधा?

  • मोबाईल चार्जिंग

  • मोबाईल टॉयलेट (स्वच्छतागृह)

  • पंखा

  • पिण्याचे पाणी

  • बसण्यासाठी व्यवस्था

  • ऊन, वारा, पाऊस बचावासाठी संरक्षण अच्छादन

  • ट्रेनची अपडेट माहिती देणारा इलेक्ट्रॉनिक फलक

  • रेल्वे सुरक्षा जवानांचा कडक पहारा

  • गर्दी नियंत्रणाचे

  • अतिरिक्त नियोजन...

  • अतिरिक्त तिकीट बुकिंग

  • काऊंटरची व्यवस्था

  • अतिरिक्त मनुष्य बळ तैनात

  • कमर्शिअल स्टाफ, आरपीएफ निरीक्षक/जवान, टिसी, अतिरिक्त एटीव्हीएम/अतिरिक्त तिकीट काऊंटर

  • नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

  • कंट्रोल रूमसह मदत केंद्र

Pune Railway Station Holi Rush
Pune Airport International Growth: पुणे विमानतळाची जागतिक झेप; आंतरराष्ट्रीय प्रवाशांत 64% वाढ

आगामी होळी सणासाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. त्यासाठी अधिकच्या होळी विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. खास करून उत्तर भागासह कोकण आणि अन्य भागांत होळीनिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होते. या गर्दीमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, याकरिता आम्ही पुणे रेल्वेस्थानकावर पार्सल विभागाशेजारी स्वतंत्र होल्िंडग एरिया तयार केला आहे. या कक्षात प्रवाशांना सर्व पायाभूत सुविधा पुरवल्या आहेत. गर्दीच्या काळात या कक्षात प्रवाशांना थांबवून प्लॅटफॉर्मवर गाडी आल्यावर एका रांगेत नेऊन गाडीत बसवले जात आहे. यामुळे प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी रोखण्यात आम्हाला यश मिळत आहे.

हेमंतकुमार बेहरा, विभागीय वाणिज्य अधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news