Pune Airport International Growth: पुणे विमानतळाची जागतिक झेप; आंतरराष्ट्रीय प्रवाशांत 64% वाढ

उड्डाणांमध्ये 74% वाढ; पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून उदय
Pune International Airport
Pune International AirportPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे विमानतळाने जागतिक स्तरावर आपली मोहोर उमटवत 2025 या वर्षात आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीत नवी विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांमध्ये 74 टक्के, तर प्रवाशांच्या संख्येत तब्बल 64 टक्क्यांची वाढ झाली असून, पुणे विमानतळ हे पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय केंद्र (इंटरनॅशनल हब) म्हणून उदयास येत असल्याचे चित्र समोर येत आहे.

Pune International Airport
Maharashtra Agriculture Awards Online Application: राज्य कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रणाली सुरू; शेतकऱ्यांना घरबसल्या अर्जाची सुविधा

विमानतळ प्रशासनाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार,सन 2024 मध्ये पुणे विमानतळावरून 2 लाख 5 हजार 460 प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. त्यासाठी त्याच वर्षभरात 1,492 विमानोड्डाणे झाली होती. मात्र, 2025 मध्ये हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. 2025 या वर्षात एकूण 3 लाख 38 हजार 770 प्रवाशांनी सातासमुद्रापार प्रवास केला असून, आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्याही वाढून या वर्षात 2,601 वर पोहचली आहे. प्रवासीसंख्येतील ही 1.33 लाखांची वाढ पुण्याच्या वाढत्या आर्थिक आणि औद्योगिक क्षमतेचे निदर्शक मानली जात आहे.

Pune International Airport
UPSC CAPF Assistant Commandant Recruitment: यूपीएससीकडून CAPF अंतर्गत 349 सहायक कमांडंट पदांची भरती जाहीर

सध्याचे मार्ग आणि वाढती मागणी

सध्या पुण्याहून दुबई (शारजाह), सिंगापूर आणि बँकॉकसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. आयटी प्रोफेशनल, उद्योजक आणि पर्यटकांकडून या मार्गांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, पुण्याचे वाढते महत्त्व पाहता पुणेकरांनी आता युरोप आणि अमेरिकेसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याची तसेच सध्याच्या उड्डाणांच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी लावून धरली आहे.

Pune International Airport
Pune Dengue Chikungunya Cases: डेंग्यू-चिकुनगुनियात पुणे आघाडीवर; मात्र डेंग्यूमुळे एकही मृत्यू नाही

पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवासाला मिळणारा प्रतिसाद सकारात्मक आहे. विशेषतः नवीन टर्मिनल कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. सन 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये प्रवासी आणि उड्डाणांच्या संख्येत झालेली ही वाढ विमानतळाच्या विस्तार धोरणाचे यश आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन भविष्यात आणखी काही आंतरराष्ट्रीय शहरांशी पुणे जोडण्यासाठी प्रयत्न केले जातील.

संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

Pune International Airport
Drug Resistant TB Six Month Treatment: औषध-प्रतिरोधक क्षयरोगावर सहा महिन्यांत प्रभावी उपचार; आयसीएमआरचा अभ्यास

पुण्याहून आंतरराष्ट्रीय उड्डाणांची संख्या वाढणे, ही प्रवाशांसाठी आनंदाची बाब आहे. पूर्वी दुबई किंवा सिंगापूरला जाण्यासाठी मुंबई विमानतळ गाठावे लागायचे. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाया जायचे. आता पुण्यातूनच थेट विमानसेवा उपलब्ध झाल्यामुळे आमचा प्रवास सुखकर झाला आहे. मात्र, बँकॉक आणि दुबईप्रमाणेच आता युरोप आणि अमेरिकेसाठीही पुण्यातून थेट कनेक्टिव्हिटी मिळावी, अशी आमची अपेक्षा आहे.

प्रेरणा सांगळे, नियमित आंतरराष्ट्रीय प्रवासी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news