Pune Railway Station: पुणे रेल्वेस्थानकावर ३.४१ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मिझोरामच्या महिलेला अटक

स्वर्ण जयंती एक्स्प्रेसमधून तस्करीचा डाव उधळला; ॲम्फेटामाइन, क्रिस्टल मेथ आणि एमडीएमएचा साठा हस्तगत
Pune Railway Station
Pune Railway StationPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे रेल्वेस्थानकावर महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे प्रादेशिक पथकाने मोठी कारवाई करीत तब्बल ३.४१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी मिझोराममधील ३२ वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून ॲम्फेटामाइन, क्रिस्टल मेथ आणि एमडीएमएचा साठा जप्त केला असून, या कारवाईमुळे आंतरराज्यीय अमली पदार्थतस्करीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. लालरेमलियानी (वय ३२, रा. रामह्लून, ऐझॉल, मिझोराम) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे.

Pune Railway Station
Pune Toxic Liquor Case: विषारी दारू मृत्युकांडातील मुख्य आरोपी बाळू लोंढे जेरबंद; उरुळी कांचनमध्ये फिल्मी स्टाईल पाठलाग

मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी (दि. २५ ऑगस्ट) पहाटे पुणे रेल्वेस्थानकावर सापळा रचला होता. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकावरून म्हैसूरकडे जाणाऱ्या स्वर्ण जयंती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या संशयित महिलेला फलाट क्रमांक ३ वर अडविण्यात आले.

Pune Railway Station
Pune PMPML: तरुणीच्या मृत्यूनंतरही पीएमपीचा जीवघेणा प्रवास सुरूच; दरवाजाला लटकून प्रवाशांचा प्रवास!

राजपत्रित महिला अधिकाऱ्याच्या उपस्थितीत तिच्या सामानाची झडती घेतली असता २ हजार ५३२ ग्रॅम पांढऱ्या-पिवळ्या रंगाचा स्फटिकयुक्त पदार्थ आढळला. तसेच, ८७८ ग्रॅम विविध रंगांच्या गोळ्या सापडल्या. नार्कोटिक्स डिटेक्शन किटच्या तपासणीत हे पदार्थ अमली असल्याचे स्पष्ट झाले. जप्त केलेल्या अमली पदार्थांची बाजारातील किंमत सुमारे ३.४१ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.

Pune Railway Station
Pune COEP Hostel Row: सीओईपी वादाला नवे वळण! काँग्रेस-एनएसयूआयच्या १५० कार्यकर्त्यांवर गुन्हा; पत्रकारालाही तक्रारीत ओढल्याने संताप

अटक केलेली महिला लालरेमलियानी हिच्या चौकशीत तिने 'अशिमा' नावाच्या आफ्रिकी व्यक्तीच्या सांगण्यावरून अमली पदार्थांची वाहतूक करीत असल्याची माहिती दिली. तिकीट आणि बॅगची व्यवस्था अशिमानेच केली होती. म्हैसूरला पोहचल्यानंतर लोकेशन शेअर करून बॅग संबंधित व्यक्तीच्या ताब्यात देण्याच्या सूचना तिला दिल्या होत्या.

Pune Railway Station
Pune Uruli Devachi Waste Processing: उरुळी देवाची कचरा प्रक्रियेसाठी ५७७ कोटींचे ‘ग्रीन सिग्नल’; भाजप बहुमताने प्रस्ताव मंजूर

महिलेच्या मोबाईलची तपासणी केल्यानंतर तस्करीच्या रॅकेटशी संबंधित महत्त्वाचे धागेदोरे डीआरआयच्या हाती लागले आहेत. या प्रकरणात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपी महिलेला विशेष एनडीपीएस न्यायालयात हजर केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news