Pune Kidnapping Rescue: पुणे रेल्वेस्थानकावरून अपहरण झालेल्या 1 वर्षाच्या बाळाची 16 तासांत सुटका

बंडगार्डन पोलिस आणि गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई; दौंड येथे तिघांना अटक, बालिका सुरक्षित परत मिळाली
Pune Railway Station
Pune Railway StationPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे रेल्वेस्थानक परिसरातून अपहरण करण्यात आलेल्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीची बंडगार्डन पोलिस आणि गुन्हे शाखेने अवघ्या 16 तासांत सुखरूप सुटका केली. रेल्वेस्थानक परिसरातून चिमुकलीला पळवून नेणाऱ्या तिघा संशयितांना पोलिसांनी दौंड येथे ताब्यात घेतले असून, त्यांच्या ताब्यातून बालिकेची सुरक्षित सुटका करण्यात आली.

Pune Railway Station
SRA TDR Scam: विठ्ठलनगर-नेहरुनगर एसआरए घोटाळा? BSUP लाभार्थ्यांनंतर टीडीआरवर प्रश्नचिन्ह

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 30) रात्री साडेनऊच्या सुमारास पुणे रेल्वेस्थानकाजवळील दत्त मंदिरासमोरील मोकळ्या जागेत भोसले कुटुंबीय आपल्या एक वर्षाच्या मुलीसह झोपले होते. दिवसभराच्या श्रमानंतर आई-वडील गाढ झोपेत असताना अज्ञातांनी संधी साधून बालिकेला उचलून नेले.

Pune Railway Station
Pune Urban Heat Island Effect Study: पुण्यात उष्णतेचा कहर; जमिनीचे तापमान 58 अंशांवर पोहोचले

काही वेळाने आईला जाग आली तेव्हा मुलगी दिसून न आल्याने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच बंडगार्डन पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपायुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात बंडगार्डन पोलिस आणि गुन्हे शाखेची विशेष पथके तातडीने कामाला लागली. तपासादरम्यान पुणे रेल्वेस्थानक आणि परिसरातील 65 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.

Pune Railway Station
Pune Toxic Liquor Public Reaction: विषारी दारूकांडानंतर कारवाई सुरू; पण आधीच का नाही? नागरिकांचा तीव्र सवाल

अनेक तासांच्या पाहणीनंतर एका महिला आणि पुरुषासोबत अपहृत बालिका जात असल्याचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यावरून तपासाची दिशा निश्चित झाली. तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हींच्या आधारे संशयितांनी पुणे रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून सुटलेल्या पनवेल-नांदेड-पनवेल रेल्वेतून प्रवास केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पुणे ते नांदेड मार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांना सतर्क करण्यात आले. आरपीएफ, जीआरपी, स्थानिक पोलिस, गुन्हे शाखेच्या पथकांमध्ये समन्वय साधून शोध मोहीम राबवण्यात आली.

Pune Railway Station
Pune Illegal Liquor Case: उरुळी कांचन विषारी दारू प्रकरण; 4 पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन

पोलिस शोधताहेत अपहरणामागील नेमके कारण?

चिमुकलीच्या शोधासाठी कुर्डूवाडी, बार्शी, सोलापूर, लातूर, दौंड आदी ठिकाणी पोलिसांची स्वतंत्र पथके रवाना केली. अखेर रविवारी दुपारी दौंड रेल्वेस्थानक परिसरात संशयितांचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बालिकेचे अपहरण केल्याची कबुली दिली. अवघ्या 16 तासांत बालिकेचा शोध घेऊन तिला सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांकडून अपहरणामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू असून, बंडगार्डन पोलिस पुढील चौकशी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news