Pune Women Bike Rally: 'पुढारी' महिला बाईक रॅलीने पुणे दणाणले; नऊवारीत रणरागिणींची दमदार स्वारी

मित्रमंडळ चौकातून सुरू झालेल्या रॅलीत शेकडो महिलांचा उत्साह; ढोल-ताशांच्या गजरात ‘गो ग्रीन’चा पर्यावरण संदेश
Pune Women Bike Rally
Pune Women Bike RallyPudhari
Published on
Updated on

पुणे: सकाळच्या कोवळ्या उन्हात जेव्हा शेकडो महिला आपल्या दुचाकींसह मित्रमंडळ चौकात जमल्या तेव्हा ते दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. कुणाच्या अंगावर काठापदराची नऊवारी साडी, कुणाच्या पायात कोल्हापुरी साज, नाकात नखरेल नथ अन्‌‍ डोक्यावर मानाचा फेटा, अशा पेहरावातील रणरागिणींनी बुलेट आणि दुचाकींना किक मारली तेव्हा त्यांच्या आत्मविश्वासाचा आवाज अवघ्या पुण्यात घुमला. डोळ्यांवर लावलेला गॉगल त्यांच्यातील आधुनिक आणि सक्षम स्त्रीची ओळख पटवून देत होता.

Pune Women Bike Rally
Pune Women Bike Rally: 'पुढारी' महिला बाईक रॅलीने पुणे दुमदुमले; परंपरा आणि आधुनिकतेचा अनोखा संगम

सकाळी 8 वाजता मित्रमंडळ चौकातून रॅलीचा शुभारंभ झाला. ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि ‌‘जय भवानी, जय शिवाजी‌’... ‌‘गणपती बाप्पा मोरया...‌’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ही रॅली दांडेकर पूल, शास्त्री रोड, अलका चौकातून कुमठेकर रोडमार्गे ऐतिहासिक विश्रामबागवाड्यापाशी पोहचली. शनिवारवाड्याला वळसा घालून शिवाजी रोडने ही रॅली स्वारगेटच्या दिशेने निघाली. तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा पुणेकरांनी या ‌‘स्त्रीशक्ती‌’चे कौतुक करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Pune Women Bike Rally
Pune Vegetable Market: गॅस तुटवड्याचा पुणे मार्केट यार्डावर परिणाम; भाज्यांचे भाव 20–25% नी घसरले

स्वारगेट चौकातून सारसबाग आणि महालक्ष्मी मंदिरमार्गे या रॅलीचा समारोप पुन्हा ‌‘पुढारी‌’ कार्यालयासमोर झाला. या वेळी महिलांच्या चेहऱ्यावरील उत्साह ओसंडून वाहत होता. ही रॅली म्हणजे केवळ एक प्रवास नव्हता, तर तो महिलांच्या आत्मसन्मानाचा आणि सक्षमीकरणाचा भव्य सोहळा ठरला.

या रॅलीचा फ्लॅग ऑफसाठी मोटार वाहन निरीक्षक अमृता भालशंकर, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक कल्याणी ढोमे, आपुलकी मेडिकल सेंटरचे डॉ. प्रीतेश मुनोत, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या व्यवस्थापिका अंजली तुपे यांच्यासह अभिनेता अक्षय पाटील, अभिनेत्री अंकिता पनवेलकर आणि वैभवी चव्हाण उपस्थित होते.

Pune Women Bike Rally
Pune Fruit Market: पुणे फळबाजारात लिंबाचे भाव घसरले; रमजान व उन्हामुळे रसदार फळांना मागणी

या रॅलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला प्रशस्तिपत्र आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. तसेच, ‌‘गो ग््राीन थीम‌’वर आधारित सजावट करणाऱ्या पाच ग््रुाप लीडर्सना साड्या देण्यात आल्या. उत्कृष्ट सजावट केलेल्या तीन गाड्यांना साड्यांचे बक्षीस, तर उत्कृष्ट पारंपरिक वेशभूषा करणाऱ्या तीन महिलांना मानाची साडी प्रदान करण्यात आली.

या उपक्रमाला पॉवर्ड बाय क्रस्ना डायग्नोस्टिक्स, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटी (फायनान्स पार्टनर), सन मराठी (एंटरटेन्मेंट पार्टनर), ग््राँट मेडिकल फाउंडेशन-रुबी हॉल क्लिनिक (हेल्थ पार्टनर), अदानी (सहप्रायोजक) आणि ॲम्बोनिक फर्टिलिटी अँड आयव्हीएफ सेंटर (सहप्रायोजक) यांचे सहकार्य लाभले आहे. सुवर्णकला जेम्स अँड ज्वेलरी हे गिफ्ट पार्टनर म्हणून लाभले होते.

Pune Women Bike Rally
Pune Wholesale Market: गहू, ज्वारी, तांदूळ व डाळीचे भाव स्थिर; साखर व तेलाची मागणी वाढली

‌‘गो ग््राीन‌’चा पर्यावरणाभिमुख संदेश

ही रॅली केवळ उत्सवापुरती मर्यादित नव्हती, तर त्याला सामाजिक जबाबदारीचीही जोड होती. ‌‘गो ग््राीन‌’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या रॅलीद्वारे प्रदूषणमुक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. हातामध्ये पर्यावरणाविषयीचे फलक घेऊन महिलांनी पुणेकरांना निसर्गरक्षणाची साद घातली.

लाडक्या कलाकारांची मांदियाळी

रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे ‌‘सन मराठी‌’वरील ‌‘हुकूमाची राणी‌’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकार. अक्षय पाटील (इंद्रा), अंकिता पनवेलकर (मालती) आणि वैभवी चव्हाण (राणी) यांनी रॅलीत प्रत्यक्ष सहभागी होऊन महिलांचा उत्साह वाढविला. आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news