pune porsche accident : अगरवाल पिता-पुत्रांना चौदा दिवसांची कोठडी

pune porsche accident : अगरवाल पिता-पुत्रांना चौदा दिवसांची कोठडी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील चालकाच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह आजोबांना न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. सुरेंद्रकुमार ब—ह्मदत्ता अगरवाल (वय 77) आणि विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल (वय 50, दोघही रा. ब्र ह्मा सनसिटी, वडगाव शेरी) अशी त्यांची नावे असून, त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. या गुन्ह्यात चालक गंगाधर शिवराज हेरिक्रूब (वय 42) यांनी फिर्याद दिली आहे.

अपघाताची घटना घडल्यानंतर

अपहरणाचा प्रयत्न करून बंगल्यात डांबून ठेवत मोबाईल काढून घेतल्याप्रकरणी मुलाचे आजोबा सुरेंद्रकुमार आणि वडील विशाल या
दोघांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात चालक गंगाधर हेरिक्रूब यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात दोघांना अटकेनंतर दोघांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत आल्यानंतर त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. पांडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. विशाल अगरवाल याने चालकाचे अपहरण केल्यावर हिसकावून घेतलेला मोबईल पोलिसांनी जप्त केला आहे. अपहरण करण्यासाठी आणखी कोणी मदत केली, 'सीसीटीव्ही' चित्रीकरणात छेडछाड करण्यासाठी कोणी मदत केली, याबाबत तपास सुरू असून, अगरवाल बाप-लेक उडवाउडवीची उत्तरे देत आहेत, अशी माहिती तपास अधिकारी खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप मानकर यांनी न्यायालयात दिली.

या गुन्ह्यात अन्य आरोपींचा सहभाग निष्पन्न करण्यासाठी अगरवाल बाप-लेकाच्या पोलिस कोठडीत पाच दिवसांची वाढ करण्याची मागणी सरकारी वकील नितीन लडकत आणि योगेश कदम यांनी युक्तिवादादरम्यान केली. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. प्रशांत पाटील यांनी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याच्या मागणीस विरोध केला. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेत पिता-पुत्रांना 14 दिवसांची कोठडी सुनावली.

जामिनासाठी अर्ज

न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर सुरेंद्रकुमार अगरवाल व विशाल अगरवाल यांचा जामिनासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलाला कार चालविण्यास दिल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात विशाल अगरवाल याने जामिनासाठी अर्ज केला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news