Pune Porsche Accident: अल्‍पवयीन संशयिताची आईही पोलिसांच्या ताब्‍यात

Pune Porsche Accident
Pune Porsche Accident

पुणे : पुढारी ऑनलाईन पुणे पोर्श घटना प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन संशयित आरोपीच्या आईलाही अटक केली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली.

संशयित आरोपीच्या आईलाही ताब्यात घेतले

पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी गुन्हे शाखेने कारवाई करत अल्पवयीन संशयित आरोपीच्या आईलाही ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल हिने आपल्या मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात नुसती छेडछाडच केली नाही तर ते बदललेही. ही बातमी समोर येताच शिवानी भूमिगत झाली. अखेर पुणे पोलिसांनी तीला शोधून काढले आहे. काल रात्री ती मुंबईहून पुण्यात आली. अटकेची औपचारिकता लवकरच पूर्ण केली जाईल.

आईने मुलाबदली आपल्‍या रक्‍ताचा नमुना दिला

वास्तविक, या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना त्याच्या आईच्या रक्ताच्या नमुन्याने बदलण्यात आला होता. मुलाच्या रक्ताचा नमुना चाचणीसाठी न देता आईने आपल्‍या रक्‍ताचा नमुना दिल्‍याच्या कारणाने आईला अटक करण्यात आली आहे. रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी दोन डॉक्टरांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, अल्पवयीन संशयीत आरोपीच्या रक्ताचा नमुना एका महिलेच्या रक्ताच्या नमुन्याने बदलण्यात आला होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news