Pune police suspension data: सात वर्षांत 61 जण बडतर्फ; 333 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही निलंबन

गंभीर गैरवर्तनाच्या आरोपांमुळे संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे दिसून येते.
Police
Police Pudhari
Published on
Updated on

पुणे: कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पुणे शहर पोलिस दलातच शिस्तभंग आणि गैरप्रकारांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या सात वर्षांत तब्बल 333 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, 61 जणांना थेट सेवेतून बडतर्फ केले आहे.

भष्टाचार, कर्तव्यातील हलगर्जीपणा, अधिकाराचा गैरवापर, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींशी संबंध, अवैध धंद्यांना खतपाणी घालणे, तसेच गंभीर गैरवर्तनाच्या आरोपांमुळे संबंधित पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे दिसून येते.

Police
Khed Road Potholes Scam: खेड तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्गांवर खड्डे भरण्याचे फसवे रेकॉर्ड!

तर काही प्रकरणांमध्ये विभागीय चौकशीनंतर कठोर निर्णय घेण्यात आले. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिस दलात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

गेल्या काही महिन्यांत पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. त्यामुळे पोलिस दलाच्या प्रतिमेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक, महिला पोलिस आणि अन्य एका कर्मचाऱ्याने नामांकीत कॉलेजच्या प्राचार्यांना ब्लॅकमेलिंग करून त्याच्याकडून सात लाखांची खंडणी उकळली.

Police
Pune Acid Attack: प्रेमप्रकरणातून तरुणीसह मित्रावर ॲसिड हल्ला; तरुणी 45 टक्के भाजली

वाघोली पोलिस ठाण्यातील तीन पोलिसांनी आयटी अभियंता तरुण-तरुणीला वेश्याव्यवसायात अडकविण्याची धमकी देत पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला होता. तर, एका जमिनीच्या अर्ज प्रकरणात तब्बल 28 लाख रुपयांची लाच घेताना महिला अधिकारी व दोघांना एसीबीने अटक केली.

कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यातील अंमलदाराने वॉरंट न बजाविण्यासाठी व अटक न करण्यासाठी एका कंपनीच्या मालकांकडून पाच लाख घेतले. पुन्हा आणखी दीड लाख मागणी केली. असे अनेक प्रकार पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आणि बडतर्फीचे कारण ठरले आहेत. एकीकडे पोलिस दलाची शिस्त, पारदर्शकता आणि विश्वासाहर्ता जपण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कठोर भूमिका घेतली जाते आहे. तर दुसरीकडे काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वर्तन पोलिस दलाची मान झुकविणारे ठरत आहे.

60 पोलिस अधिकारी, 273 कर्मचारी निलंबित

शहर पोलिसांच्या आकडेवारीनुसार, 2020 ते एप्रिल 2026 दरम्यानच्या कालावधीत 60 अधिकारी आणि 273 पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 2023 आणि 2024 या दोन वर्षात कारवाईचा आलेख मोठा आहे. तर गेल्या सात वर्षांत 61 जणांना बडतर्फ केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news