नियम मोडण्यात पुण्याचे पोलिसच आघाडीवर

नियम मोडण्यात पुण्याचे पोलिसच आघाडीवर
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  'लोका सांगे ब—ह्मज्ञान…' असे टि्वट करीत पुणेकरांनी पोलिसांच्या कृत्याला सचित्र समोर आणले होते. हे वृत्त सर्वप्रथम दैनिक 'पुढारी'ने प्रकाशित केले. त्याची दखल घेत पोलिसांनीच ही आकडेवारी उघड केली. त्यात चक्क पोलिसांनाच सर्वाधिक दंड झाल्याचे कबूल केले आहे. पोलिसांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबतीत नागरिकांच्या सूचनेची दखल घेत दैनिक 'पुढारी'ने वृत्त प्रसिध्द केले होते. वृत्त प्रसिध्द होताच वाहतूक विभागाने केलेल्या कारवाईचे एक टि्वट केले आहे. त्यामध्ये पोलिसांकडून सर्वाधिक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर शासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा दुसरा क्रमांक आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे होणाऱ्या कारवाईचा आकडासुद्धा मोठा आहे. दरम्यान, सतर्क पुणेकरांच्या नजरेतून वाहतूक नियम मोडणारे पोलिस सुटू शकले नाहीत. त्यांनी या पोलिसांचे फोटो काढून वाहतूक पोलिसांना टि्वट करीत 'हा सूर्य आणि तो जयद्रथ' दाखविला. दैनिक 'पुढारी'ने याबाबतचे फोटो आणि टि्वटचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या वाहतूक विभागाने कारवाईची आकडेवारीच टि्वट केली.

गेल्या पंधरा दिवसांत वाहतूक विभागाने पोलिस, शासकीय सेवेतील कर्मचारी, पीएमपीएल, वकील, डॉक्टर, सैन्यदल, मीडिया प्रतिनिधी यांच्यावर कारवाई केली आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे सर्वच जबाबदार नागरिकांचे कर्तव्य असून, वाहतूक नियम मोडणार्‍यांवर कारवाई करणे पोलिसांचे काम आहे. त्यामुळे त्यांनी कारवाईत दाखविलेली तत्परता स्वागतार्ह आहे.

पंधरा दिवसांतील कारवायांचे आकडे
पोलिस : 392
शासकीय अधिकारी : 160
पीएमपीएल कर्मचारी : 30
वकील व डॉक्टर : 151
सैन्यदल : 35
प्रसारमाध्यमे : 27

सुदर्शनद्वारे हे शक्य आहे…
वाहतूक शाखेकडून पोलिस, आर्मी इत्यादी गाड्यांवर कारवाई होत नाही, असे म्हटले जाते. पण, हे शक्य आहे. सुदर्शनद्वारे (सीसीटीव्ही), असे वाहतूक पोलिसांनी टि्वटद्वारे म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news