अफजल खान वधाच्या जिवंत देखाव्यासाठी अखेर पुणे पोलिसांची परवानगी

अफजल खान वधाच्या जिवंत देखाव्यासाठी अखेर पुणे पोलिसांची परवानगी

पुढारी ऑनलाईन डेस्क : येणाऱ्या गणेशउत्सवामध्ये अफजल खान वधाचा जिवंत देखावा करण्यासाठी पुण्यातील कोथरूड पोलिसांनी प्रथमतः परवानगी नाकारली. पण गणेश मंडळाच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने आणि पाठपुरवठ्याने अखेर पोलिसांना देखाव्यासाठी परवानगी द्यावी लागली.

कोथरूडमधील संगम गणेश मंडळाने 'अफजल खान वध' या देखाव्यासाठी पुणे पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्यावेळी पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने मंडळाला देखाव्यासाठी परवानगी नाकारली होती. यानंतर मंडळाने याचा निषेध करून ईमेल द्वारे ही गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. यासोबत २६ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्याचा इशाराही मंडळाने दिला होता. या धर्तीवर पुणे पोलिसांनी अखेर परवानगी नाकारण्याचे पत्र मागे घेऊन देखवासाठी परवानगी दिली आहे.

हे वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news