Pune Police Externment Action: पुण्यातील १२ सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार; परिमंडळ-२ पोलिसांची धडक कारवाई

खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी, अवैध हत्यारे व अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत सहभागी आरोपींवर कारवाई; पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यातून हद्दपार
Police Externment
Police ExternmentPudhari
Published on
Updated on

पुणे: शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पुणे पोलिस दलाने पुन्हा एकदा कठोर पाऊल उचलले आहे. परिमंडळ-२ च्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या, खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या १२ सराईत गुन्हेगारांवर २ वर्षांसाठी तडीपारीची धडक कारवाई केली आहे.

Police Externment
Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवासाठी पुणे सज्ज; मिरवणूक मार्गांवरील खड्डे, ड्रेनेज, अतिक्रमणे हटविण्याचे आयुक्तांचे आदेश

पोलिस उप-आयुक्त (परिमंडळ-२) मिलिंद मोहिते यांनी हे तडीपारीचे आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार संबंधित सर्व १२ आरोपींना पुणे शहर पोलिस आयुक्तालय, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीतून पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार केले आहे.

Police Externment
Pune Central Government Schemes: पुणे जिल्ह्यातील केंद्र योजनांना गती; प्रलंबित कामांसाठी कालमर्यादा निश्चित करण्याचे मोहोळांचे निर्देश

...अशी आहे बारा तडीपारांची यादी

पर्वती पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दीपक प्रकाश गायकवाड (वय २४, रा. गल्ली नं. ८३, जनता वसाहत, पर्वती, पुणे), चेतन संजय भालेराव (वय २७, रा. सर्व्हे नं. १३०, दांडेकर पूल, जय महाराष्ट्र मित्र मंडळाजवळ, पुणे), भीमा शत्रूघ्न शिंदे (वय २५, रा. गल्ली नं. ५८, जनता वसाहत, पर्वती, पुणे). भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्‍या हद्दीतील अजिंक्य संतोष काळे (वय २४, रा. स. नं. २५/२, गणे शनगर, आंबेगाव पठार, पुणे), सरफराज ऊर्फ डर समीर शेख (वय २४, रा. एस.आर.ए. कॉलनी, लेक टाऊन सोसायटीजवळ, कात्रज, पुणे), महेश ऊर्फ बंटी विनायक चव्हाण (वय २२, रा. ८/अ/१, जुने बाफना ऑफिसमागे, खोपडेनगर, कात्रज, पुणे).

Police Externment
MPSC Students: प्रथमेश देशमुखच्या मृत्यूने स्पर्धा परीक्षार्थी संतप्त; ‘ही आत्महत्या नव्हे, परीक्षा व्यवस्थेचा बळी’

बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्‍या हद्दीतील केतन शाम टेमकर (वय २३, रा. तयबा मशिदीजवळ, अप्पर बिबवेवाडी, पुणे), खुशाल ऊर्फ दाद्या संतोष शिंदे (वय २४, रा. राजीव गांधी नगर, बिबवेवाडी, पुणे). सहकारनगर पोलिस ठाणे ठाण्याच्‍यसा हद्दीतील जितेंद्र ऊर्फ मोन्या संजय लोंढे (वय २५, रा. गल्ली नं. ७०, तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे), रोहण राजेंद्र रोंगे (वय २०, रा. गोविंदराव पाटील नगर, आशिष प्लाझामागे, धनकवडी, पुणे), स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नरेश ऊर्फ नब्बा सचिन दिवटे (वय २५, रा. दांडेकर पूल, पेट्रोल पंपासमोर, सिंहगड रोड, पुणे), आंबेगाव पोलिस ठाण्याच्‍या हद्दीतील जितेंद्र शंकर चिंधे (वय ३२, रा. काका पवार तालीम रस्ता, लिपाणे वस्ती, जांभूळवाडी रोड / वडारवस्ती, कर्वेनगर, पुणे) .

Police Externment
NMMS Exam 2026-27: एनएमएमएस परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; ७ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्काची मुदत

ही कारवाई पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह-आयुक्त संजय दराडे, आणि अपर पोलिस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप-आयुक्त (परिमंडळ-२) मिलिंद मोहिते यांनी हे आदेश दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news