Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवासाठी पुणे सज्ज; मिरवणूक मार्गांवरील खड्डे, ड्रेनेज, अतिक्रमणे हटविण्याचे आयुक्तांचे आदेश

आयुक्त नवल किशोर राम, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, आमदार हेमंत रासणे यांची संयुक्त पाहणी; गणेशोत्सव संपेपर्यंत नवीन रस्ते खोदाईला ब्रेक
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationPudhari
Published on
Updated on

पुणे: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग आणि गर्दीच्या परिसरातील रस्ते, वाहतूक व पायाभूत सुविधांची स्थिती सुधारण्यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मिरवणूक मार्ग आणि गर्दीच्या परिसरातील रस्ते, वाहतूक तसेच पायाभूत सुविधांची डागडुजी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

Pune Municipal Corporation
Pune Central Government Schemes: पुणे जिल्ह्यातील केंद्र योजनांना गती; प्रलंबित कामांसाठी कालमर्यादा निश्चित करण्याचे मोहोळांचे निर्देश

पुण्यातील वैभवी गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी आमदार हेमंत रासणे, महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कसबा आणि विश्रामबाग वॉर्ड कार्यालयांच्या हद्दीतील प्रमुख मिरवणूक मार्गांची संयुक्त पाहणी केली. या वेळी खड्डे, ड्रेनेज, विद्युत व्यवस्था, पदपथ, अतिक्रमणे आणि वाहतुकीच्या प्रश्नांचा आढावा घेतला.

Pune Municipal Corporation
MPSC Students: प्रथमेश देशमुखच्या मृत्यूने स्पर्धा परीक्षार्थी संतप्त; ‘ही आत्महत्या नव्हे, परीक्षा व्यवस्थेचा बळी’

गणेेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि भाविकांची गर्दी होणार असल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महापालिका आणि पोलिस प्रशासनाने समन्वयाने नियोजन करावे, असेही स्पष्ट केले. कसबा गणपती मंदिरापासून पाहणीला सुरुवात झाली. त्यानंतर शिवाजी रोड, भाऊ रंगारी गणपती, तांबडी जोगेश्वरी, केळकर रोड, पासोड्या विठोबा मंदिर, सोन्या मारुती मंदिर, सोमेश्वर मंदिर, रांका ज्वेलर्स, महाराणा प्रताप रस्ता, कस्तुरी चौक, जैन मंदिर, नाईक हॉस्पिटल, फडके पोलिस चौकी, सेवा मित्रमंडळ, मंडई गणपती, दगडूशेठ गणपती देखावा, गुरुजी तालीम, लक्ष्मी रस्ता आणि पुरम चौक परिसराची पाहणी केली.

Pune Municipal Corporation
NMMS Exam 2026-27: एनएमएमएस परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू; ७ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्काची मुदत

नवीन खोदाईला ब्रेक

गणेशोत्सव संपेपर्यंत पाणीपुरवठा, ड्रेनेज, महावितरण आणि अन्य युटिलिटी विभागांनी नवीन रस्ते खोदाई टाळावी. यापूर्वी झालेल्या खोदाईची कामे तातडीने पूर्ण करून रस्ते समतल करावेत, असे स्पष्ट निर्देश दिले. ड्रेनेज विभागाने मुख्य वाहिन्यांची पाहणी करून गळती आणि तुंबलेल्या वाहिन्यांची दुरुस्ती करावी, असेही सांगण्यात आले. महावितरण आणि विद्युत विभागाने उघड्या तारा सुरक्षित कराव्यात, तसेच पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या डीपी बॉक्सबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. अतिक्रमणांमुळे मिरवणूक आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठीही संबंधित विभागांनी दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

Pune Municipal Corporation
Maharashtra Private Coaching Centre Act 2026: खासगी शिकवणी केंद्रांच्या मसुद्यावर ११ हजारांहून अधिक हरकती; सूचना देण्याची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत

रस्ते सुस्थितीत ठेवण्यावर विशेष भर

क्षेत्रीय कार्यालयांनी त्यांच्या हद्दीतील खड्डे आणि खराब रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, तर पथ विभागाने प्रत्यक्ष देखरेख ठेवून कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले. कसबा, मंडई आणि स्वारगेट मेट्रोस्थानक परिसरातील मोठी गर्दी लक्षात घेऊन या भागातील रस्ते सुस्थितीत ठेवण्यावर विशेष भर देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news