

पुणे: पुण्यातील एका सराईत गुंडाचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री एन्काउंटर केला आहे. सोलापुरातील लांबोटी गावाच्या परिसरात ही चकमक घडली. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख (वय 23) असे या सराईत गुंडाचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला त्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथक त्याला पकडण्यासाठी गेले होते. प्राथमिक माहितीनुसार शाहरुख याने सुरुवातीला पोलिसावर गोळीबार. त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्यावर गोळी झाडली. (Latest Pune News)
गंभीर जखमी झाल्यानंतर शाहरुखला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्याच उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आता लांबोटी गावामध्ये दाखल झाले आहेत.