Pune Police News: अरेरे..! त्यांच्या कृत्याने ‘खाकी‌’ कलंकित

पोलिस दलातील काही कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून अधिकाराचा गैरवापर
Police Crime
Crime News Pudhari News Network
Published on
Updated on

पुणे : पुणे शहर पोलिस दल गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी कृत्य, लाचखोरी व बेशिस्त वर्तनामुळे बदनाम होऊ पाहते आहे. पोलिस दलातील काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरफायदा उचलत अशा काही गोष्टी केल्या, ज्यातून पोलिसांना पोलिसांवरच गुन्हे दाखल करण्याची वेळ आली.

पोलिसाने कायदा मोडणे आणि सर्वसामान्य नागरिकांनी कायद्याची चौकट ओलांडणे, यात मोठा फरक. पोलिसांची समाजात एक वेगळी प्रतिमा आहे. कायदा व सुव्यस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने नागरिक त्यांच्याकडे नेहमीच वेगळ्या नजरेतून पाहतात. कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे तेच गुन्हेगारी कृत्य करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या कृत्याने खाकीवर कलंकित होण्याची वेळ आली आहे.

Police Crime
Crime News Pune: खासगी क्लासच्या ऑफिस बॉयचा विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; व्हिडीओ चित्रीकरणही केले

20 हजार उकळले

लॉ कॉलेज रोडवर मोटारीत मैत्रिणीसोबत बोलत थांबलेल्या एका व्यक्तीला धमकावून दोघा पोलिसांनी 20 हजार रुपये उकळले होते. एटीएममध्ये जाऊन त्यांनी हे पैसे घेतले होते. दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने डेक्कन पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तेव्हा या कर्मचाऱ्यांचा हा धक्कदायक प्रकार समोर आला.

पोलिसांचे झिंग झिंग झिंगाट

काळेपडळ पोलिस ठाण्यातील दोघा पोलिसांनी कर्तव्यावर असतानाच दारूच्या नशेत राडा घातला. एकाने भरती सारख्या संवेदनशील बंदोबस्तात मद्य प्राशन केले, तर दुसऱ्याने थेट पोलिस ठाण्याच्या आवारातच मद्यधुंदावस्थेत गाडी चालवत महिला तक्रारदाराला उडविले.

प्राचार्यांकडून खंडणी उकळली

मंगळवार पेठेतील एका नामांकित कॉलेजच्या प्राचार्यांना बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक करण्याची भीती दाखवून एका पोलिस उपनिरीक्षकासह तीन पोलिसांनी सात लाखांची खंडणी उकळली. त्यामध्ये शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दामिनीमार्शल म्हणून कर्तव्यावर असलेल्या रीलस्टार महिला पोलिसाचा समावेश होता. अद्याप हे तिघे फरार आहेत.

खंडणीखोर पोलिसासह दोघांवर गुन्हा

बोपदेव घाटात फोटोशूटसाठी आलेल्या चेन्नईतील तरुणांना मारहाण करीत गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन 28 हजार रुपयांची खंडणी कोंढवा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्माचाऱ्याने उकळली होती. त्या पोलिसाने या तरुणाला भीती दाखविण्यासाठी पोलिस ठाण्याचे गेट आणि ससून रुग्णालयात घेऊन गेला होता. परंतु, तरुणाला संशय आला आणि त्याने थेट कोंढवा पोलिस ठाणे गाठले.

Police Crime
Pune Crime: शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य; रिक्षाचालकाला अटक

आम्ही पोलिस; आमचे कोण काय करणार?

विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असलेल्या ‌‘कॉप्स-24‌’च्या चौघा पोलिसांनी मद्यप्राशन करून व्यावसायिकांना शिवीगाळ करून राडा घातला होता. आम्ही पोलिस आहे, आमचे कोणी काही करू शकत नाही. आमच्याकडे पैसे मागितले तर तुम्हाला हद्दीत धंदा करून देणार नाही, असे बोलून गैरवर्तन करीत शिवीगाळ केली.

...हे तर खंडणीवसुलीचे नाके

मित्रासोबत कोरेगाव पार्क परिसरात आलेल्या एका व्यक्तीकडून कारवाईच्या धाकाने पोलिसांनी तीनवेळा पैसे उकळले. पुढे काही अंतरावर त्याला परत नाकाबंदी दिसली. त्याला वाटले आता पोलिस आपल्याला येथे अडवूनपैसे घेणार, त्यामुळे त्याने गाडी वेगात बॅरीकेडला धडकून पळवली. त्यामध्ये एक महिला पोलिस हवालदार जखमी झाल्या. या व्यक्तीला पोलिसांनी पकडले. त्यातून सहायक पोलिस निरीक्षकासह चौघा पोलिसांचा नाकाबंदीतील प्रताप उघड झाला.

तक्रार आल्याचे सांगून तीन हजार उकळले

बाणेर पोलिस ठाण्यांतर्गत ‌‘कॉप्स-24‌’ म्हणून कर्तव्यावर असलेल्या तिघा पोलिसांनी सोसायटीच्या अध्यक्षांना तक्रारीच्या अनुषंगाने धमकावून तीन हजार रुपयांची लाच घेतली होती.

तरुणाला धमकावून 50 हजार मागितले

येरवडा पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी एका तरुणाला धमकावून 50 हजार रुपये मागितले. तो हात जोडून विनंती करीत होता. अहो माझी चूक काय, हे तरी सांगा? असे विचारत होता. त्या वेळी पोलिसांनी खाकी वर्दीचा रुबाब झाडत त्याला दरडावले. तरुणाने त्याच्या मामाला ही माहिती दिली. त्या वेळी या दोघा पोलिसांचा खाबूगिरीचा फंडा पुढे आला.

वाघोली पोलिस ठाण्यातील लुटारू त्रिकूट

वाघोली पोलिस ठाण्यातील दोघे बीट मार्शल आणि ठाणे अंमलदार या तिघांनी आयटी अभियंता तरुण-तरुणीला सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी देत दहा हजार रुपये उकळले. तरुणाला मारहाण केली, तर त्याच्या मैत्रिणीला ताटकळत उभे ठेवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news