Pune Crime: शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य; रिक्षाचालकाला अटक

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 24 तासांत न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केले.
minor girl molestation
minor girl molestationfile photo
Published on
Updated on

पुणे: शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य करून पसार झालेल्या रिक्षाचालकाला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 24 तासांत न्यायालयात आरोपपत्र देखील दाखल केले.

युनूस गफार खान (वय 55, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत एका शाळकरी मुलीने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, खान याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.

minor girl molestation
War Impact: आखाती देशातील युद्धाचा परिणाम; कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

6 मार्च रोजी पीडित 11 वर्षीय शाळकरी मुलगी शाळेतून घरी निघाली होती. त्या वेळी रिक्षाचालक खान याने मुलीशी अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या मुलीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर खान पसार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेतला.

खान याला अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून आवश्यक ते पुरावे संकलित करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

minor girl molestation
Baramati Cyber Fraud: बारामतीत पुन्हा सायबर ठगांकडून 92 लाखांची फसवणूक

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी 24 तासांत आरोपपत्र दाखल केले. परिमंडळ सहाचे पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, नीलेश जगदाळे, सहायक पोलिस निरीक्षक विनोद साने, दत्तात्रय खेडेकर, कानेकर यांनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news