Pune Police Corruption: अवैध धंद्यांशी संबंध; पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याला मोठी शिक्षा

जुगार चालकाच्या संपर्कात राहिल्याने वेतनवाढ रोखण्याची कारवाई; पोलिस दलात खळबळ
Police
PolicePudhari
Published on
Updated on

पुणे: मटका, जुगारसारखे अवैध धंदे चालविणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराच्या संपर्कात राहून त्याचे लांगुलचालन करणे समर्थ पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या एका पोलिस शिपायाला चांगलेच महागात पडले आहे. त्या पोलिस कर्मचाऱ्याची ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याचा ठपका ठेवत त्याला एक वर्ष वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Police
Mula Mutha Pollution: मुळा-मुठा नदी प्रदूषणाचा फटका; हवेलीतील शेती नापीक होण्याच्या मार्गावर

परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांच्या संपर्कात असलेल्या पोलिसांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. हे पोलिस कर्मचारी समर्थ पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहेत. आरोपी प्रवीण राजेंद्र चव्हाण (वय 35, रा. सोमवार पेठ) याच्या संपर्कात हे पोलिस महाशय होते.

Police
CET Exam Irregularities: सीईटी परीक्षा व्यवस्थेत गैरव्यवहाराचा आरोप; धनंजय कुलकर्णींचा गंभीर दावा

समर्थ पोलिसांच्या दप्तरी चव्हाण याच्यावर जुगार, शस्त्र अधिनियम, महाराष्ट्र पोलिस अधिनियम, दंगल असे गुन्हे दाखल आहेत. पोलिस कर्मचारी हे वैद्यकीय रजेवर होते. मात्र, तरी देखील ते एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल आठ वेळा चव्हाण याच्या संपर्कात होते. 2025 मधील ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात हा प्रकार घडला होता. चौकशीत त्यांचा हा प्रकार पोलिस उपायुक्तांच्या निदर्शनास आला.

Police
Bhor CNG Pipeline Issue: भोरच्या सारोळ्यात सीएनजी पाइपलाइनवरून वाद; नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप

त्यामुळे त्या पोलिस कर्मचाऱ्याची ही बाब अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याचा ठपका ठेवत सुरुवातीला दोन वर्षे वेतनवाढ रोखण्याची शिक्षा रावले यांनी दिली होती. मात्र, पोलिस कर्मचाऱ्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यामध्ये अंशतः बदल करून ही शिक्षा एक वर्ष वेतनवाढ रोखण्याची देण्यात आली आहे. त्यामुळे अवैध धंदे चालविणाऱ्या संपर्कात राहणाऱ्यांना हा एक प्रकारे इशाराच असल्याचे बोलेले जाते आहे.

Police
Pune Railway Station Crowd Management: पुणे रेल्वेस्थानकावर ‘होल्डिंग एरिया’; उन्हाळी गर्दी नियंत्रणासाठी नवे नियोजन

यापूर्वी गुन्हे शाखेच्या दोघांचे निलंबन

दरम्यान, या प्रकरणात गुन्हे शाखेच्या दोघा पोलिस कर्मचाऱ्यांचे यापूर्वी निलंबन करण्यात आले होते. हे कर्मचारीदेखील प्रवीण चव्हाण या मटका, जुगार चालविणाऱ्या आरोपीच्या संपर्कात असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. नोव्हेंबर 2025 मध्ये जुगार घेणाऱ्या औंदुबर अर्जुन सोनावणे याला समर्थ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याने चव्हाण याच्यासाठी मटका जुगार घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर चव्हाण याला ताब्यात घेऊन रावले यांच्या समोर हजर करण्यात आले. त्यावेळी चव्हाण याचा मोबाईल तपासला तेव्हा गुन्हे शाखेचे हे दोघे त्याच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या दोन पोलिसांवर निलंबनाची कारवाई केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news