Pune Arms License Cancellation: पुणे पोलिसांचा धडाका; 289 शस्त्र परवाने रद्द, 476 अर्ज फेटाळले

स्वसंरक्षणाच्या नावाखाली दिलेले परवाने रद्द; गरज सिद्ध न झाल्यास परवाना नाही असा पोलिसांचा स्पष्ट इशारा
License
LicensePudhari
Published on
Updated on

पुणे: शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी (दि.28) एका दिवसात तब्बल 40 शस्त्र परवाने रद्द केले. नूतनीकरण न करणे, शस्त्राची प्रत्यक्ष गरज नसल्याचे निष्पन्न होणे तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमीसह इतर विविध कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्त म्हणून पदभार हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकूण 289 परवाने रद्द, तर 476 अर्ज फेटाळण्यात आले आहेत.

License
New TB Vaccines: क्षयरोगाविरुद्ध नवी लस प्रभावी; VPM1002 आणि Imuvacचा दिलासा

रद्द करण्यात आलेल्या परवान्यांमध्ये 2020, 2021 आणि 2022 या कालावधीत मंजूर करण्यात आलेल्या परवान्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. मागील काही वर्षांत ‌‘स्वसंरक्षणासाठी परवाना हवा‌’ असे कारण देत अनेकांनी पिस्तूल परवाने मिळविले होते. मात्र, संबंधितांकडे कोणताही ठोस धोका, धमकी किंवा कायदेशीर आधार नसल्याचे पोलिसांच्या पडताळणीत आढळून आले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता अशा परवान्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

License
Maharashtra TET Exam 2026: महाराष्ट्र टीईटीसाठी विक्रमी नोंदणी; सहा लाख उमेदवार परीक्षा देणार

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शस्त्र परवाना प्रक्रियेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. अर्जदारांची पार्श्वभूमी, परवान्याची गरज, सुरक्षेचा धोका आणि वापर यांची सखोल छाननी केली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण 289 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय, शस्त्र परवाना मिळविण्यासाठी आलेले तब्बल 476 अर्ज नाकारण्यात आले आहेत. किरकोळ वाद, सामाजिक असुरक्षितता किंवा कोणताही ठोस पुरावा नसताना करण्यात आलेले अर्ज फेटाळण्यात येत आहेत.

License
Pune Crime: लग्नास नकार; तरुणीचा पाठलाग करत जीवे मारण्याची धमकी

...परवाना हवा? तर कारणही भक्कम हवे!

पुण्यात शस्त्र परवाना मिळवायचा असेल, तर प्रत्यक्ष जीवितास धोका असल्याचे पुरावे, पोलिस नोंदी किंवा कायदेशीर कारण आवश्यक ठरणार आहे. केवळ भीती, वाद किंवा अंदाजांवर आधारित अर्जांना आता कात्री लावली जात आहे.

एकही शस्त्रपरवाना मंजूर नाही

खेळाडू सोडता पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपल्या कार्यकाळात एकही शस्त्र परवाना मंजूर केला नाही. त्यामुळे पोलिस आयुक्तालयात नवीन शस्त्र परवान्यासाठी दाखल होणाऱ्या अर्जाचे प्रमाण आता शुन्यावर आहे.

License
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल 4 मेनंतर; विद्यार्थ्यांची प्रतीक्षा वाढली

शस्त्र गरज म्हणून हवे, तर गरज सिद्ध झाली पाहिजे. त्यानुसार प्रत्येक अर्जाची सखोल पडताळणी करूनच पुढील निर्णय घेतला जात आहे

अमितेश कुमार, पोलीस आयुक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news