Pune PMPML Operational Loss: पीएमपीएमएलसाठी पुणे महापालिकेकडून 484 कोटींचा हिस्सा मंजूर

वाढत्या संचलन तुटीवर उपाय; स्थायी समितीची मान्यता, एमएनजीएल थकीत देयकांसाठी 10 कोटींची तरतूद
PMPML
PMPMLPudhari
Published on
Updated on

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) 2025-26 या आर्थिक वर्षातील वाढत्या संचलन तुटीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुमारे 484.96 कोटी रुपयांचा हिस्सा देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली असून, ही रक्कम समसमान मासिक हप्त्यांत वितरित केली जाणार आहे.

PMPML
Pune 23 Villages Development Plan: 23 गावांचा विकास आराखडा आता महापालिकेकडे; पीएमआरडीएचा निर्णय

2024-25 या वर्षात पीएमपीची एकूण अंदाजित संचलन तूट 808.26 कोटी रुपये इतकी गृहीत धरण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार या तुटीपैकी 60 टक्के हिस्सा महापालिकेने उचलायचा आहे. त्यानुसार 484.96 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद महापालिकेच्या अंदाजपत्रकात ‌‘पीएमपीच्या संचालन तुटीचा हिस्सा‌’ या शीर्षाखाली केल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

PMPML
Pune Katraj Tunnel Accident: कात्रज बोगद्याजवळ एसटी-रिक्षा धडक; रिक्षाचालक ठार, 3 जखमी

दरम्यान, सेवा सुरळीत ठेवण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीकडे थकीत देयकांसाठी अपवादात्मक बाब म्हणून 10 कोटी रुपये आगाऊ देण्यासही मान्यता देण्यात आली आहे. ही रक्कम पुढील देयकांतून समायोजित केली जाणार आहे. तसेच, कर आकारणी व संकलन विभागाकडील थकबाकी आणि इतर समायोजनांतून निधी उभारण्याची तरतूदही प्रस्तावात नमूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news