Pune Accident |पीएमपीएमएलचे अध्यक्ष महेश आव्हाड यांच्या वाहनाचा भीषण अपघात; चालक, बॉडीगार्ड गंभीर जखमी

महेश आव्हाड यांना किरकोळ दुखापत झाली असून ते थोडक्यात बचावले
PMPML Chief Mahesh Awhad Accident
पीएमपीएमएलचे अध्यक्ष महेश आव्हाड यांच्या वाहनाचा भीषण अपघातPudhari
Published on
Updated on

PMPML Chief Mahesh Awhad Car Accident

पुणे : मुंबईहून पुण्याकडे येत असताना पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांच्या वाहनाला मळवली परिसरात भीषण अपघात झाला. या अपघातात वाहनचालक आणि बॉडीगार्ड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने महेश आव्हाड यांना किरकोळ दुखापत झाली असून ते थोडक्यात बचावले आहेत.

अपघातानंतर बोलताना महेश आव्हाड यांनी सांगितले की, “नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो. एका मोबाईल मिनी व्हॅन चालकाने अत्यंत बेशिस्तपणे रस्त्यात अचानक यू-टर्न घेतल्यामुळे आमच्या वाहनाचा भीषण अपघात झाला.”

PMPML Chief Mahesh Awhad Accident
Pune Crime : पुण्यात दुकानदाराकडून 10 वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

या धडकेत वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गाडीचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात इतका गंभीर होता की चालक आणि सुरक्षा रक्षकाला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.

महेश आव्हाड यांनीही या अपघातात किरकोळ मार लागल्याचे सांगितले. सध्या त्यांच्यावरही वैद्यकीय तपासणी आणि उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले.

PMPML Chief Mahesh Awhad Accident
Pune Crime: पुण्यात पत्नीच्या खूनप्रकरणी 74 वर्षीय पतीला जन्मठेप

दरम्यान, या अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्गावरील बेशिस्त वाहनचालकांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अचानक यू-टर्न आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे गंभीर अपघात घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news