

भोर : पुढारी वृत्तसेवा : वणवा लागून शेतातील पिकांसह पाइपलाइनचे पाइप जळाले. वणवा लावणार्यावर कारवाई करून बाधित शेतकर्यास नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. टिटेघर (ता. भोर) येथे ही घटना सकाळी साडेअकरा वाजता घडली.
चिखलगाव बाजूकडून सकाळी आलेला वणवा टिटेघर येथील अनिल बबन निगडे यांच्या शेतात पोहोचला. या वणव्यात त्यांच्या शेतातील पाइपलाइन व पिकाचे अंदाजे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. स्थानिकांनी वेळीच वणवा नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
मागील 8 दिवासांपूर्वी देखील तुकाराम गायकवाड यांच्या शेतात वणवा लागून गव्हाचे पीक तसेच वीजपंपाचा स्टार्टर आणि केबल जळाली. परिसरात वारंवार वणवे लावण्याचे प्रकार घडत आहेत. वणवा लावणार्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
हेही वाचा