Pune Panshet Road Accident: पुणे-पानशेत रस्त्यावर काळाचा घाला; दोन भीषण अपघातांत १३ वर्षीय मुलासह दोघांचा मृत्यू

वरदाडे येथे दुचाकी-टेम्पोची धडक, सोनापूर पेठेत दोन दुचाकींचा अपघात; तिघे जखमी, एकावर गुन्हा दाखल
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

वेल्हे: पुणे-पानशेत रस्त्यावर रविवारी (दि. १५) दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातांत १३ वर्षीय मुलासह दोघांचा मृत्यू झाला. वरदाडे येथे दुचाकी आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात दिवाळीच्या सुटीसाठी मामाकडे आलेल्या साईराज आबेश कोंढाळकर (वय १३, रा. सणसनगर, ता. हवेली) याचा मृत्यू झाला, तर सोनापूर पेठ येथील वळणावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन रामदास काशिनाथ निवंगुणे (वय ५२, रा. आंबी, ता. हवेली) यांचा मृत्यू झाला.

Accident
Bhimashankar Temple: भीमाशंकर दर्शनाच्या वेळेत बदल नाही; वाहनांबाबतही निर्बंध नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका!

सोनापूर येथील अपघातप्रकरणी रॉयल एनफिल्ड दुचाकीचालक जसराज परदेशी याच्याविरुद्ध हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाच दिवशी घडलेल्या या दोन दुर्घटनांमुळे पुणे-पानशेत रस्त्यावरील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वरदाडे येथे दुचाकी आणि टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात साईराज कोंढाळकर याचा मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो रस्त्याच्या कडेला उलटला.

Accident
Alandi Kartiki Wari 2026: आळंदी कार्तिकी वारीचे वेळापत्रक जाहीर; ४ डिसेंबरला कार्तिक एकादशी, ६ डिसेंबरला संजीवन समाधी सोहळा

दिवाळीच्या सुटीसाठी मामाकडे आलेल्या साईराजचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, सोनापूर पेठ येथे रविवारी सकाळी सुमारे १० वाजून ४५ मिनिटांनी दुसरा अपघात घडला. पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, पानशेतकडून पुण्याच्या दिशेने जाणारी रॉयल एनफिल्ड दुचाकी (एमएच १२ एक्सएस ९६९८) जसराज परदेशी हा चालवत होता.

Accident
Pune Run For Unity: पुणे रन फॉर युनिटीमध्ये परदेशी धावपटूंचे वर्चस्व; इथिओपिया, केनियाच्या खेळाडूंची बाजी

सोनापूर पेठ येथील वळणावर त्याने भरधाव वेगात व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दुचाकी चालविल्याने समोरून पुण्याकडून येणाऱ्या स्प्लेंडर दुचाकीला (एमएच १२ यूबी ९१७५) धडक बसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या अपघातात स्प्लेंडरवरील रामदास काशीनाथ निवंगुणे यांचा मृत्यू झाला. तर सारिका रामदास निवंगुणे आणि रॉयल एनफिल्ड चालक जसराज परदेशी हे जखमी झाले.

Accident
Sinhagad Fort: सिंहगड घाटात मद्यपी पर्यटक आणि स्थानिकांमध्ये तुंबळ हाणामारी; दोघांना मारहाण, मोबाईल गायब

अपघातात दोन्ही दुचाकींचेही नुकसान झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी मृत रामदास निवंगुणे यांचे नातेवाईक आकाश दत्तात्रय निवंगुणे (वय २९, रा. निवृत्तीनगर, वडगाव बुद्रुक, मूळ रा. आंबी) यांनी हवेली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जसराज परदेशी याच्याविरुद्ध गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.